Tejasswi Prakash हिच्या गोल्डन ड्रेसच्या सर्वत्र चर्चा; किंमत थक्क करणारी
अभिनेत्री तेजस्वी प्रकाश कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये कायम अभिनेत्रीच्या आयुष्याबद्दल चर्चा रंगलेल्या असतात. आता अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
1 / 5
अभिनेत्री तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःच्या जीवनातील महत्त्वाच्या गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते. तेजस्वी हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
2 / 5
तेजस्वी प्रकाश हिने आपल्या करिअरची सुरूवात टीव्ही मालिकांपासून केलीये. विशेष म्हणजे तेजस्वी प्रकाश हिने अनेक मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आता देखील अभिनेत्री चाहत्यांमध्ये चर्चेत असते.
3 / 5
महत्त्वाचं म्हणजे बिग बॉसच्या घरात धमाकेदार गेम खेळताना तेजस्वी प्रकाश हिने चाहत्यांचं लक्ष वेधलं आणि "बिग बॉस 15"ची ट्रॉफी स्वतःच्या नावावर केली. 'बिग बॉस'नंतर तेजस्वी हिच्या लोकप्रियतेत देखील प्रचंड वाढ झाली...
4 / 5
'बिग बॉस'नंतर अभिनेत्री 'नागीन' मालिकेच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आली. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त तेजस्वी हिच्या नव्या लूकची चर्चा रंगत आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेत्रीच्या नव्या ड्रेसचा बोलबाला पाहायला मिळत आहे.
5 / 5
नुकताच, अभिनेत्रीने ज्या गोल्डन ड्रेसवर फोटोशूट केलं आहे. रिपोर्टनुसार अभिनेत्रीच्या ट्रेसची किंमत जवळपास ७९ हजार रुपये आहे. सोशल मीडियावर सध्या अभिनेत्रीच्या नव्या लूकची चर्चा रंगली आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.