Tejaswini Pandit : जल्लोष आणि उत्साह; अभिनेत्री तेजश्री प्रधाननं खास अंदाजात दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा
‘अग्गंबाई सासूबाई’, ‘होणार सून मी ह्या घरची’ यासारख्या मालिकांमधून अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan) हिने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. छोट्या पडद्यासोबतच रंगभूमी, मराठी चित्रपट आणि बॉलिवूडमध्येही तेजश्री प्रधानने धडक मारली आहे. (Tejaswini Pandit: Happy Diwali from actress Tejashree Pradhan)
1 / 5
सध्या सर्वत्र दिवाळीचा उत्साह पाहायला मिळतोय. अशात तुमचे लाडके कलाकार दिवाळी स्पेशल फोटोशूट करत चाहत्यांचं मन जिंकत आहेत. नुकतंच मराठी मालिकांमधील लाडकी सून अर्थात अभिनेत्री तेजश्री प्रधानने खास फोटोशूट केलं आहे.
2 / 5
नाकात नथ, मराठी साज आणि दिवाळीचा उत्साह या फोटोमध्ये स्पष्ट दिसतो आहे. या फोटोंमध्ये तेजश्री कमालीची सुंदर दिसतेय. शिवाय तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांच्या खास पसंतीस उतरले आहेत.
3 / 5
हे फोटो आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हे फोटो शेअर करत तिने चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
4 / 5
‘अग्गंबाई सासूबाई’, ‘होणार सून मी ह्या घरची’ यासारख्या मालिकांमधून अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan) हिने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. छोट्या पडद्यासोबतच रंगभूमी, मराठी चित्रपट आणि बॉलिवूडमध्येही तेजश्री प्रधानने धडक मारली आहे.
5 / 5
‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेतील शुभ्राच्या व्यक्तिरेखेतून अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं. गेली दीड वर्ष तिने शुभ्राची भूमिका साकारली. झी मराठी वाहिनीवरील ‘होणार सून मी ह्या घरची’ (Honar Soon Me Hya Gharchi) मालिकेतील जान्हवीच्या व्यक्तिरेखेने तेजश्री प्रधान लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. 2013 ते 2016 या साडेतीन वर्षांच्या कालावधीत श्री-जान्हवीच्या जोडीचं प्रेक्षकांवर गारुड होतं. तिचा ‘काहीही हं श्री’ हा डायलॉग तर अजूनही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. सहा सासवांची लाडकी सून प्रेक्षकांना आपल्या घरची वाटू लागली. अगदी झी मराठी अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट नायिका, सून, जोडी अशा सर्वच महत्त्वाच्या पुरस्कारांवर सलग तीन वर्ष तिने नाव कोरलं.