‘तेरे नाम’ या पहिल्याच चित्रपटानं अभिनेत्री भूमिका चावला बॉलिवूडमध्ये रात्रभरात स्टार बनली भूमिका चावला बऱ्याच काळापासून हिंदी सिनेमापासून दूर आहे. एकेकाळी सलमान खानसोबत रोमान्स करुन फेमस झालेल्या हा भूमिकाचा साधा- भोळा चेहरा अजूनही लोकांच्या हृदयात आहे. मात्र आता ती साधी भूमिका खूप बदलली आहे.
2003 मध्ये 'तेरे नाम' या चित्रपटाद्वारे भूमिकाने हिंदी चित्रपट जगतात प्रवेश केला. 'तेरे नाम' हा चित्रपट सलमान खानच्या करिअरचा लाइफ ब्लड मानला जातो. मात्र या चित्रपटाची मुख्य अभिनेत्री म्हणून भूमिकेला काही फायदा झाला नाही.
'तेरे नाम' शिवाय भूमिकाने 'रन', 'दिल ने जिसे अपना कहा', 'सिलिसिले', 'गांधी माय फादर', 'दिल जो भी कहें' या हिंदी चित्रपटांतही काम केलं आहे.
भूमिकानं आपल्या दक्षिण करिअरची सुरुवात 'युवाकुडू' या चित्रपटाद्वारे केली होती. हा चित्रपट हिट ठरला आणि या चित्रपटाचा भूमिकाला पहिल्यांदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा तेलगू फिल्मफेअर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.
भूमिका चावलाचा जन्म 21 ऑगस्ट 1978 रोजी झाला होता. तिचा प्रियकर भरत ठाकूरशी 4 वर्ष डेटिंग केल्यानंतर दोघांनी 2007 मध्ये लग्न केलं आणि 2014 मध्ये त्यांना मुलगा झाला.
भूमिका अनेक वर्षांपासून बॉलिवूडमधून गायब आहे, मात्र या दिवसांत ती तमिळ आणि तेलगू चित्रपटांमध्ये दिसली आहे.