आशिकी 3 चित्रपटामध्ये कार्तिक आर्यन याच्यासोबत चक्क ही अभिनेत्री करणार रोमान्स
या चित्रपटामध्ये सिद्धार्थ रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर हे मुख्य भूमिकेत होते. आता आशिकी ३ हा चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चा होत आहे.
1 / 5
सिद्धार्थ रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर याचा आशिकी हा रोमँटिक चित्रपट हीट ठरला होता. हा चित्रपट २०१३ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले.
2 / 5
या चित्रपटामध्ये सिद्धार्थ रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर हे मुख्य भूमिकेत होते. आता आशिकी ३ हा चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चा होत आहे
3 / 5
आशिकी ३ मध्ये कार्तिक आर्यन हा मुख्य भूमिकेत असणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. मात्र, कार्तिक आर्यन याच्यासोबत कोणती अभिनेत्री मुख्य भूमिकेत असेल यावर गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चा रंगत होत्या.
4 / 5
आता आशिकी ३ या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत सारा अली खान असणार असल्याची चर्चा सुरू आहे. म्हणजेच काय तर सारा अली खान ही कार्तिक आर्यन याच्यासोबत रोमान्स करताना दिसणार आहे.
5 / 5
यापूर्वीही कार्तिक आर्यन आणि सारा अली खान यांनी सोबत स्क्रीन शेअर केलीये. मात्र, यांचा तो चित्रपट फ्लाॅप गेला. चाहते देखील कार्तिक आणि साराला एकत्र पाहण्यास आतुर आहेत.