बाॅलिवूड अभिनेता सोनू सूद हा कायमच चर्चेत राहतो. कोरोनानंतर लोकांच्या मदतीसाठी सोनू सूद हा मैदानात उतरला. मागेल त्याला या काळात सोनू सूद याने मदत केली.
विशेष बाब म्हणजे कोरोनानंतर आताही सोनू सूद हा लोकांची मदत करताना कायम दिसतो. आतापर्यंत अनेकांना थेट नोकऱ्याही सोनू सूद याने दिल्या आहेत.
आता थेट सोनू सूद याच्या नावाने एक थाळी लॉन्च करण्यात आलीये. ही मंडी थाळी असून यामध्ये एकूण 20 लोक एकत्र बसून जेवू शकतात. ही अत्यंत मोठी थाळी आहे.
सोनू सूद याने त्याचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत चाहत्यांना याची माहिती दिली आहे. आता सोनू सूद याची ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.