भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा तिच्या चाहत्यांमध्ये हॉट आणि बोल्ड अॅक्टसाठी ओळखली जाते. सध्या ती पती विक्रांतसिंग राजपूतसमवेत गोव्यात सुट्टीवर आहे.
मोनालिसानं नुकतंच आपला हॉट लूक चाहत्यांमध्ये शेअर केला आहे, जो चाहत्यांमध्ये व्हायरल झाला आहे. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आणखी काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती बिकिनीत पूलसाइडला मस्त मूडमध्ये दिसते आहे.
मोनालिसाने यापूर्वीही चाहत्यांसोबत बिकिनी लुक मधील फोटो शेअर केले आहेत. ती आपल्या बोल्ड अभिनयातून चाहत्यांची मनं जिंकते.
मोनालिसा ही भोजपुरीची अशी एक अभिनेत्री आहे जिनं सोशल मीडियावर सर्वात धाडसी फोटो शेअर केले आहेत.
अलीकडेच शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती वेगवेगळ्या प्रकारच्या पोझ देत आहे. कामातून मुक्त होण्याची चमक तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसते.
भोजपुरी अभिनेत्रीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर बिकिनीमध्ये शेअर केलेल्या फोटोसोबत एक गमतीशीर कॅप्शन देखील लिहिलं आहे की, 'आपलं व्यस्त आयुष्य विसरून जा, आराम करण्याची वेळ आली आहे ...'