द केरळ स्टोरी हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर तूफान अशी कामगिरी करताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूडच्या मोठ्या स्टारचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप जाताना दिसत आहेत.
यादरम्यानच केरळ स्टोरी चित्रपटाने धमाकेदार कामगिरी केलीये. विशेष म्हणजे अजूनही प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता ही बघायला मिळत आहे.
द केरळ स्टोरी हा चित्रपट सतत चर्चेत आहे. चित्रपटाचा टिझर रिलीज झाल्यानंतर अनेकांनी थेट या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी ही केली होती. थेट अनेकांनी कोर्टात देखील धाव घेतली. मोठ्या वादानंतर चित्रपट 5 मे रोजी रिलीज झाला.
या मुलाखतीमध्ये सोनिया बलानी हिने खुलासा केला की, लोक मला सध्या मेसेज करून शिव्या घालत आहेत. मी हिंदू देवांबद्दल काही बोलले असे ते म्हणत आहेत. मात्र, या चित्रपटात केवळ ISIS आणि दहशतवादावर भाष्य करण्यात आले आहे.