बाहुबली 2’च्या निर्मात्यानी केले मोठे भाष्य, शाहरुख खान याच्या पठाणची रेकॉर्डब्रेक कामगिरी
शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाने तूफान कामगिरी केलीये. या चित्रपटाने आतापर्यंत अनेक रेकाॅर्ड हे आपल्या नावावर केले आहेत. नुकताच या चित्रपटाने बाहुबली 2 चा रेकाॅर्ड देखील मोडलाय.
1 / 5
शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाका करताना दिसत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत अनेक रेकाॅर्ड आपल्या नावावर नोंदवले आहेत. या चित्रपटाची चाहत्यांमध्ये क्रेझ बघायला मिळत आहे.
2 / 5
नुकताच शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाने बाहुबली 2 चा रेकाॅर्ड मोडला आहे आणि पठाण हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. पठाण चित्रपटासाठी शाहरुख खान याचे काैतुक केले जात आहे.
3 / 5
शाहरुख खान याने पठाण चित्रपटाच्या माध्यमातून तब्बल चार वर्षांनी मोठा पडद्यावर पुनरागमन केले आहे. 2019 मध्ये शाहरुख खान याचा झिरो हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर प्लाॅप गेला होता.
4 / 5
शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाने आता बाहुबली 2 चा रेकाॅर्ड तोडल्यानंतर बाहुबली 2 च्या निर्मात्याने शाहरुख खान याच्यासह चित्रपट निर्मात्यांचे काैतुक करत एक पोस्ट शेअर केलीये.
5 / 5
हिंदीमध्ये पठाणने 'बाहुबली 2 चा रेकॉर्ड मोडला आहे. बाहुबली 2 ने 510 कोटींचे कलेक्शन केले होते, तर पठाणने हिंदीमध्ये 511.70 कोटींची कमाई केली. यानिमित्त्याने बाहुबली 2 च्या निर्मात्याने पोस्ट शेअर करत काैतुक केले आहे.