लाडक्या ‘नट्टू काकां’ना शेवटचा निरोप देण्यासाठी पोहोचली ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ची टीम, पाहा फोटो…
‘तारक मेहता उल्टा चष्मा’ या मालिकेत अभिनेता घनश्याम नायक उर्फ नट्टू काका यांची कर्करोगाशी झुंज अपयशी ठरली. अभिनेते घनश्याम नायक यांचे रविवारी निधन झाले.
1 / 7
‘तारक मेहता उल्टा चष्मा’ या मालिकेत अभिनेता घनश्याम नायक उर्फ नट्टू काका यांची कर्करोगाशी झुंज अपयशी ठरली.
2 / 7
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये नट्टू काकाची भूमिका करणारे अभिनेते घनश्याम नायक यांचे रविवारी निधन झाले.
3 / 7
‘नट्टू काकां’च्या मृत्यूनंतर त्यांच्यावर सोमवारी सकाळी 10:30 वाजता कांदिवली पश्चिम येथील डहाणूकर वाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
4 / 7
यावेळी आपल्या लाडक्या ‘नट्टू काकांना’ शेवटचा निरोप देण्यासाठी मालिकेत ‘जेठालाल’ साकारणारे अभिनेते दिलीप जोशी, ‘चंपक चाचा’ साकारणारे ‘अमित भट्ट’, ‘बबिता’ अर्थात अभिनेत्री मुनमुन दत्ता, निर्माते असित कुमार मोदी आणि इतर अनेक कलाकार उपस्थित होते.
5 / 7
‘नट्टू काकां’चे खरे नाव घनश्याम नायक आहे, ते 76 वर्षांचे होते. त्यांचा जन्म 12 मे 1945 रोजी झाला आणि 3 ऑक्टोबर 2021 रोजी त्यांचे निधन झाले.
6 / 7
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या टीव्ही सीरियलमध्ये ‘नट्टू काका’ जेठलालच्या दुकानात काम करत असत. ते जेठालाल आणि त्याच्या कुटुंबाच्या अगदी जवळचे दाखवले गेले होते.
7 / 7
‘नट्टू काकां’च्या निधनामुळे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या संपूर्ण कुटुंबात शोकाचे वातावरण आहे. आपल्या लाडक्या कलाकाराला निरोप देताना संपूर्ण टीम भावूक झालेली दिसली.