Sanjay Leela Bhansali | संजय लीला भन्साळी हॉलिवूडच्या वाटेवर, बाॅलिवूडला मोठा झटका, या बड्या एजन्सीसोबत करार?
संजय लीला भन्साळी ही त्यांच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतात. आता संजय लीला भन्साळी यांच्याबद्दल मोठी अपडेट पुढे येत आहे. यामुळे संजय लीला भन्साळी यांच्या चाहत्यांमध्ये आनंद बघायला मिळतोय. संजय लीला भन्साळी हे आता हॉलिवूडच्या वाटेवर आहेत.
1 / 5
भारतीय चित्रपट उद्योग हा जगातील सर्वात मोठ्या उद्योगांपैकी एक आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अनेक कलाकार हे हाॅलिवूड चित्रपटांमध्ये काम करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे हाॅलिवूडच्या चित्रपटांना देखील चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय.
2 / 5
बाॅलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिने देखील काही दिवसांपूर्वीच एका हाॅलिवूड चित्रपटामध्ये काम केले. गेल्या काही वर्षांपासून भारतीय स्टार्सला हॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी मिळताना दिसत आहे. रिपोर्टनुसार चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत.
3 / 5
संजय लीला भन्साळी हे हाॅलिवूडमध्ये आपला जलवा लवकरच दाखवणार असल्याची चर्चा सातत्याने रंगताना दिसत आहे. यामुळे संजय लीला भन्साळी यांचे चाहते आनंदी आहेत. मात्र, यावर संजय लीला भन्साळी यांनी काहीही भाष्य केले नाहीये.
4 / 5
एका आंतरराष्ट्रीय वेबसाइटनुसार हॉलिवूड एजन्सी विल्यम्स मॉरिस एंडेव्हर (WME) वर संजय लीला भन्साळी यांनी साइन केले आहे. अनेक मोठे स्टार या एजन्सीत सामील आहेत.
5 / 5
गंगुबाई काठियावाडी हा संजय लीला भन्साळी यांचा चित्रपट काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. या चित्रपटामुळे अगोदर मोठा वाद निर्माण झाला होता. या चित्रपटात आलिया भट्ट ही मुख्य भूमिकेत होती.