बाॅलिवूड स्टार सलमान खान हा मुंबईमध्ये गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहतो. सलमानचे हे घर आलिशान आहे. या घराची किंमत जवळपास 100 कोटी आहे. अनेकदा चाहते या घराबाहेर मोठी गर्दी करतात.
काही दिवसांपूर्वी पहिल्यांदाच अक्षय कुमार याने आपल्या घराची एक झलक दाखवली होती. अक्षयचे हे घर मुंबईतील जुहू परिसरात आहे. याची किंमत जवळपास 80 कोटी आहे.
काही दिवसांपूर्वीच अभिनेता शाहिद कपूर याने मुंबईतील वरळी भागामध्ये एक नवे घर खरेदी केले आहे. विशेष म्हणजे शाहिदचे हे घर आलिशान असून याची किंमत जवळपास 56.6 कोटी आहे.
शाहरुख खान याचा मन्नत बंगला फेमस आहे. शाहरुखच्या वाढदिवसाला चाहते मन्नत बाहेर मोठी गर्दी करतात. शाहरुख खान हा मन्नत बंगला 200 कोटींचा आहे.
हृतिक रोशन याचे देखील मुंबईमध्ये आलिशान घर आहे. या घराची किंमत जवळपास 50 कोटी आहे. अनेकदा हृतिक रोशन हा घरातील फोटो सोशल मीडियावर शेअर करतो.