सलमान खान हा नेहमीच दुबईमध्ये सुट्ट्यांसाठी जातो. रिपोर्टनुसार सलमान खान याचेही आलिशान घर दुबईमध्ये आहे. सलमान खान हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.
बाॅलिवूडच्या अनेक कलाकारांचे दुबईमध्ये आलिशान घर आहेत. शिल्पा शेट्टी हिचा एक बंगला दुबईमध्ये असून त्याची किंमत कोट्यावधीच्या घरात आहे. अगोदर तिचा बुर्ज खलिफामध्ये 104 व्या मजल्यावर फ्लॅट होता.
शाहरूख खान याचाही बंगला दुबईतील पाम जुमरेहमध्ये आहे. शाहरूख खान याचा हा बंगला अत्यंत आलिशान असल्याचे सांगितले जाते. कोट्यावधी रूपयांचा हा बंगला आहे.
अनिल कपूर यांनी 2017 मध्ये दुबईत एक फ्लॅट बूक केला होता. या फ्लॅटची किंमत कोट्यावधींच्या घरात आहे. अनिल कपूर यांची पत्नी सुनीता कपूर यांनी हा प्लॅट कुटुबियांसाठी बुक केला होता.
राखी सावंत हिचे देखील दुबईमध्ये स्वत: चे घर आहे. काही दिवसांपूर्वीच राखी सावंत हिने आपल्या घराची एक झलक चाहत्यांना दाखवली होती. दुबईच्या घराचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला होता.