सुशांत सिंह राजपूत याच्या नावावर ‘हे’ सेलिब्रिटी आजही कमावतात गडगंज पैसा, जाणून व्हाल हैराण
अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या निधनाला अनेक वर्ष झाली आहेत. पण तरी देखील फक्त चाहतेच नाहीतर, सेलिब्रिटी देखील अभिनेत्याला विसरू शकलेले नाहीत. एवढंत नाहीतर, काही असे सिलेब्रिटी देखील आहेत, जे आजही सुशांत याच्याबद्दल अनेक गोष्टी सांगत प्रसिद्धी आणि पैसा कमावतात.
1 / 6
'केदारनाथ' सिनेमाचे दिग्दर्शक अभिषेक कपूर कायम सुशांत याच्याबद्दल बोलत असतो. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत 'केदारनाथ' सिनेमाच्या शुटिंग दरम्यान सिशांत घाबरलेला होता.. असं अभिषेक म्हणाला होता.
2 / 6
अभिनेत्री अंकिता लोखंड देखील कायम सुशांतबद्दल बोलत असते. 'बिग बॉस 17' मध्ये देखील अभिनेत्री सतत सुशांत याच्याबद्दल बोलताना दिसली. ज्यामुळे अंकिता फक्त प्रसिद्धी आणि सुशांतच्या नावावर लोकप्रियता मिळवण्याचा प्रयत्न करते असं चाहते म्हणाले.
3 / 6
अभिनेत्री कंगना रनौत देखील कायम सुंशात याच्या निधनावर वक्तव्य करत बॉलिवूड सेलिब्रिटींवर निशाणा साधण्याचा प्रयत्न करत असते. बॉलिवूड माफियांमुळे सुशांतने टोकाचा निर्णय घेतला... असं देखील कंगना म्हणाली होती.
4 / 6
अभिनेत्री क्रिती सनॉन हिने देखील अनेक मुलाखतींमध्ये सुशांत याच्याबद्दल वक्तव्य केलं आहे. सोशल मीडियावर देखील दोघाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. एवढंच नाहीतर, दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा देखील रंगल्या होत्या.
5 / 6
सारा अली खान देखील या यदीत सामिल आहे. सुशांत याच्यासोबत सारा हिची चांगली मैत्री होती. 'केदारनाथ' सिनेमात दोघांनी एकत्र स्क्रिन शेअर केली. पण अभिनेत्याच्या निधनानंतर सारा देखील वादाच्या भोवऱ्यात अडकली होती.
6 / 6
अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला सुशांत याच्या निधनासाठी जबाबदार ठरवलं होतं. ज्यामुळे अभिनेत्रीला तुरुंगात जावं लागलं होतं. आता देखील अनेक मुलाखतींमध्ये अभिनेत्री सुशांत याच्याबद्दल बोलताना दिसते. एवढंच नाहीतर, रिया अभिनेता सुशांत याच्यासोबत खास क्षणी फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट करत असते.