ऐश्वर्या राय नाही तर, सलमान खान ‘या’ 5 सेलिब्रिटींचं तोंड शेवटच्या क्षणापर्यंत नाही पाहाणार

| Updated on: Dec 27, 2023 | 12:50 PM

बॉलिवूडचा दबंग खान म्हणजे अभिनेता सलमान खान याचा आज वाढदिवस आहे. सलमान खान आज कुटुंबिय आणि चाहत्यांसोबत 58 वा वाढदिवस साजरा करत आहे. फक्त चाहतेच नाही तर, अनेक सेलिब्रिटी देखील भाईजानला आज वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. पण काही असे सेलिब्रिटी देखील आहे, जे सलमान खान याचे 'जानी दुश्मन' आहेत.

1 / 5
अभिनेत्री प्रियांका चोप्रा  आणि समलान खान यांच्यामध्ये देखील वाद आहे. प्रियांका आणि सलमान यांच्यामध्ये 'भारत' सिनेमामुळे वाद झाले. प्रियांका भाईजानचा सिनेमा अर्ध्यात सोडून गेली. त्यामुळे सलमान खान प्रचंड नाराज होता.

2 / 5
अभिनेता शाहिद कपूर आणि सलमान खान देखील एकमेकांसोबत बोलत नाहीत. रिपोर्ट्सनुसार, कार्यक्रमादरम्यान शाहिद कपूरने सलमान खानची खिल्ली उडवली होती. यामुळे सलमान प्रचंड नाराज झाला होता. त्यानंतर सलमान खान आणि शाहिद कपूर यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता. पण नंतर शाहिद कपूरनेही भाईजानची माफी मागितली.

3 / 5
सलमान खान आणि रणबीर कपूर यांच्यामध्ये देखील अनेक वाद आहेत. एका पार्टीमध्ये सलमान खान आणि रणबीर कपूर यांची भांडणं झाली होती. तेव्हा रागात सलमान याने रणबीर याच्या कानशिलात लगावली होती .

4 / 5
सलमान खान आणि एआर रहमान यांच्यातील वाद देखील एकेकाळी चर्चेत होते. रिपोर्टनुसार, एआर रहमान आणि सलमान खान यांच्यात 'जय हो' सिनेमाबाबत मतभेद झाले होते. एआर रहमान यांनी या सिनेमाच्या शीर्षकावरून गुन्हा दाखल केला होता.

5 / 5
विवेक ओबेरॉय आणि सलमान खान यांच्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून दुश्मनी आहे. रिपोर्टनुसार, सलमान - विवेक यांच्यामध्ये अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्यामुळे वाद आहेत. विवेक याने सलमान खान याच्यावर अनेक आरोप केले होते.