Celebrity Names: ‘हे’ मराठी सेलिब्रिटी स्वतःच्या नावापुढे नाही लावत आडनाव

| Updated on: Oct 29, 2024 | 12:15 PM

सेलिब्रिटी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेच असतात. प्रसिद्धी झोतात आल्यानंतर आपल्या आवडत्या सेलिब्रिटींबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. दरम्यान काही असं देखील सेलिब्रिटी आहे ज्यांची खासगी आणि प्रोफेशनल लाईफ कायम चर्चेत असते. पण त्यांचे आडनाव फार कोणाला माहिती नाही. कारण सेलिब्रिटी त्यांच्या नावापुढे आडनाव लावत नाहीत. अशाच काही मराठी सेलिब्रिटींबद्दल जाणून घेऊ...

1 / 7
अमृता सुभाष - अभिनेत्री अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. पण अनेकांना अभिनेत्रीचं आडनाव माहिती नाही. अभिनेत्रीचं संपूर्ण नाव अमृता सुभाष कुलकर्णी असं आहे.

2 / 7
रसिका सुनील - 'माझ्या नवऱ्याची बायको' सिनेमामुळे प्रसिद्धी झोतात आलेली रसिका देखील नावापुढे आडनाव लावत नाही. अभिनेत्रीचं पूर्ण नाव रसिका सुनील धाबडगावकर असं आहे. आडनाव मोठं असल्यामुळे अभिनेत्री स्वतःच्या नावापुढे फक्त वडिलांचं नाव लावते.

3 / 7
सायली संजीव - सायली हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीचं आडनाव चांदसारकर असं आहे. 'काहे दिया परदेस' मुळे सायली प्रसिद्धी झोतात आली. त्यानंतर अभिनेत्रीने कधीच मागे वळून पाहिलं नाही.

4 / 7
ललित प्रभाकर - अभिनेता ललित प्रभाकर देखील स्वतःच्या नावापुढे आडनाव लावत नाही. अभिनेत्याचे आडनाव भदाणे असं आहे. पण अभिनेत्याची ओळख ललित प्रभाकर अशी आहे.

5 / 7
भाग्यश्री - 'मैने प्यार किया' सिनेमामुळे भाग्यश्री एका रात्रीत स्टार झाली. भाग्यश्रीचं आडनाव पटवर्धन असं आहे. सांगलीच्या पटवर्धन राजघराण्याची वंशज असलेल्या भाग्यश्रीचं लग्नानंतर भाग्यश्री दासानी असं नाव झालं.

6 / 7
तेजस्वी प्रकाश - तेजस्वी प्रकाश हिने अनेक मराठी मालिका आणि शोमध्ये काम केलं आहे. पण मराठमोळ्या तेजस्वीचं संपूर्ण नाव तेजस्वी प्रकाश वायंगणकर असं आहे. अभिनेत्री स्वतःच्या नावापुढे कधीच आडनाव लावत नाही.

7 / 7
अजय - अतुल - आपल्या मधुर आवाजाने सर्वांना वेड लावणारे अजय - अतुल सख्खे भाऊ आहेत. त्यांचं पूर्ण नाव अजय गोगावले आणि अतुल गोगावले असं आहे. पण त्यांना प्रत्येक जण अजय - अतुल याच नावाने ओळखतो...