तुनिशा शर्मा हिने अली बाबा: दास्तान-ए-काबुल या मालिकेच्या सेटवर शीजान खान याच्या मेकअप रूममध्ये गळफास घेत आत्महत्या केली. यानंतर मोठी खळबळ निर्माण झाली.
तुनिशा हिच्या आत्महत्येनंतर तिच्या आईने दास्तान-ए-काबुल याच मालिकेत मुख्य कलाकार असलेल्या शीजान खानवर गंभीर आरोप केले. शीजान आणि तुनिशा यांचे काही दिवसांपूर्वीच ब्रेकअप झाले होते.
शीजानसोबत ब्रेकअप झाल्यामुळेच तुनिशा ही तणावात असल्याचे सांगितले जात आहे. तुनिशा हिच्या आईने केलेल्या आरोपांनंतर शीजान खान याला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले होते.
न्यायालयाने शीजान खान याला 28 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. आता परत त्याच्या पोलिस कोठडीमध्ये वाढ ही करण्यात आलीये.
पोलिस हे शीजान खान याला न्यायालयात आज घेऊन जात असतानाचे काही फोटो समोर आले असून पायात चप्पल नाही... आणि आपले तोंड लपवतांना शीजान खान दिसला.