Phulala Sugandh Matichaa : ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेत अनोखं रक्षाबंधन, भाऊ बांधणार कीर्तीला राखी
रक्षाबंधनाच्या दिवशी कीर्तीचा भाऊ सागर तिला राखी बांधून फक्त कुटुंबाचच नाही तर देशाचं रक्षण करण्यासाठी प्रेरणा देतो. मालिकेतला हा प्रसंग नव्या बदलाची नांदी आहे असं म्हटलं तरी चालेल. (Unique Rakshabandhan in 'Phulala Sugandh Matichaa' Serial)
1 / 6
बहिण-भावाच्या नात्यातला गोडवा वाढवणारा सण म्हणजे रक्षाबंधन. भावाने आपलं रक्षण करावं म्हणून रक्षाबंधनाच्या दिवशी बहिण भावाला राखी बांधते.
2 / 6
स्टार प्रवाहच्या ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेत देखिल रक्षाबंधनाचा उत्साह पाहायला मिळणार आहे. मात्र इथे कीर्तीने आपल्या भावाला राखी बांधण्याऐवजी तिच्या भावाने तिला राखी बांधलीय.
3 / 6
कीर्तीचं शौर्य आणि तिच्या धाडसाच्या बऱ्याच गोष्टी आपण मालिकेतून पहात आलोय. नुकतंच तिने आपल्या कुटुंबाला एका मोठ्या दहशतवादी हल्ल्यातून वाचवत कौतुकाची थाप मिळवली.
4 / 6
त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी कीर्तीचा भाऊ सागर तिला राखी बांधून फक्त कुटुंबाचच नाही तर देशाचं रक्षण करण्यासाठी प्रेरणा देतो.
5 / 6
मालिकेतला हा प्रसंग नव्या बदलाची नांदी आहे असं म्हण्टलं तरी चालेल. कीर्तीने आयपीएस ऑफिसर होण्याचं स्वप्न उराशी बाळगलं आहे. कीर्तीच्या या स्वप्नपूर्तीमध्ये तिला शुभमची कशी साथ मिळणार याची देखिल उत्सुकता आहे.
6 / 6
त्यामुळे ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेचे यापुढील भाग अधिकाधिक रंजक आणि उत्कंठावर्धक असणार आहेत.