वडापाव हे मुंबईतील स्ट्रीट फूड आहे. दिल्लीच्या सैनिक विहारमध्ये याच वडापाव विक्रीने तिला ओळख दिली. चंद्रिका देरा दीक्षित आज सेलिब्रिटी बनलीय. बिग बॉस OTT 3 मध्ये ती दिसणार आहे.
शो मध्ये येताच चंद्रिका देरा दीक्षितची चर्चा सुरु झालीय. शो च्या प्रीमियरमध्ये बिग बॉस कंटेस्टेंट्सनी चंद्रिका बरोबर तिच्या प्रवासाविषयी चर्चा केली.
सना मकबूलने चंद्रिकाला विचारलं, सगळे तुलाच का ट्रोल करतात?. त्यावर तिने 'हेच मला समजत नाही, मी चा का?' असं उत्तर दिलं.
वडापाव गर्ल बोलली की, "लोकांना वाटतं दिवसाला मी 40 हजार रुपये कमावते. इतक्यात विशाल पांडे बोलला की, तू बघून घे, तुझा खर्च 6 लाख रुपये आहे"
त्यावर चंद्रिका म्हणते, "अरे, यार मी मेहनत करते. मेहनत करुन कमावत आहे. जर मी कमावतेय, तर स्वत:वर खर्च करणारना" माझ्याकडे पैसे आहेत, मग मी माझ्या मुलाला गरीबीच आयुष्य नाही देणार. घरात वडापाव गर्लची स्टोरी ऐकून अन्य स्पर्धक इम्प्रेस झाले.