Marathi News Photo gallery Cinema photos Veteran singer Lata Mangeshkar top 10 song lag ja gale meri awaj hi meri pehchan hain satyamshivam sundaram mile sur mera tumhara a mere vatan ke logo
RIP Lata Mangeshkar : लता मंगेशकरांची टॉप 10 गाणी, स्वर्गीय सुरांची मैफल
भारताच्या शिरपेचातला मानाचा तुरा आज हरपला. लता मंगेशकर यांचं जाणं म्हणजे भारततीय गायकीचं कधीही भरून न निघणारं नुकसान झालंय. पण लतादिदींची गाणी मात्र कायम आपल्या मनाला रूंजी घालत राहतील. त्यांची अशीच काही अजरामर गाणी पाहुयात...
1 / 10
'मेरी आवाजही पहचान है मेरी...' हे लतादिदींचं गाणं म्हणजे त्यांच्या जिवनाचं वर्णन करणारं आहे. लता दिदींची विशेष ओळखही त्यांचा आवाज आहे... आणि त्यांची ही जोवर सूर्य चंद्र आहे तोवर लता मंगेशकर यांची ही ओळख कायम राहिल.
2 / 10
'लग जा गले...' हे गाणं म्हणजे लता दिदींच्या गायकीचा सर्वोच्च बिंदू ठरला. त्यांचं हे गाणं 58 वर्षानंतरही तितकंच फ्रेश आहे.
3 / 10
'मिले सूर मेरा तुम्हारा' हे अतिशय सुंदर गाणं लता दिदींच्या आवाजात ऐकणं म्हणजे पर्वणीच.
4 / 10
'सत्यम शिवम सुंदरम्' हे गाणे लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गाण्याला लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं संगीत दिलं.
5 / 10
'ऐ मेरे वतन के लोगों' लतादिदींचं हे गाणं म्हणजे राष्ट्रप्रेमाने ओतप्रेत भरलेली देशवासियांना घातलेली भावनिक साद... तुमच्या माझ्या मनातलं देशप्रेम त्यांच्या आवाजातून व्यक्त होतं, असंच हे गाणं ऐकताना जाणवतं.
6 / 10
'एक प्यार का नगमा है' या गाण्याच्या साध्या बोलांमध्ये आयुष्याची खोली आहे आणि याचमुळे हे गाणं अजरामर झालंय. हे गाणे लतादीदींच्याही मनाच्या अगदी जवळ होतं.
7 / 10
'तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा' हे 'आंधी' चित्रपटातील गाणं आहे. लता मंगेशकर यांच्या आवाजातील हे गाणं म्हणजे जीवनाकडे वेगळ्या पद्धतीने बघायला शिकवतं.
8 / 10
9 / 10
'आयेगा आने वाला' या गाण्यानंतर लतादीदींनी बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. यानंतर राज कपूरच्या 'बरसात' मधील 'जिया बेकरार है, हवा मे उडता जाये' सारखी गाणी गाऊन लतादीदींनी बॉलिवूडमध्ये एक यशस्वी पार्श्वगायिका म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली.
10 / 10
लता मंगेशकर