Photo : ‘मी लेस्बियन असेन तर…’ लेकीचा अनुरागला सवाल, पाहा काय दिलं उत्तर
व्हिडीओच्या सुरुवातीला, आलिया अनुरागला विचारते की जर मी लेस्बियन आहे हे त्याला कळेल तेव्हा त्याची प्रतिक्रिया काय असेल?
(‘What If I am a lesbian…’ Aaliyah Kashyap's question to Anurag)
1 / 7
दिग्दर्शक अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यप सध्या चर्चेत आहे. फादर्स डे निमित्त तिनं एक व्हिडीओ शेअर केला होता, ज्यामध्ये तिनं वडील अनुरागला अनेक मुद्द्यांवरून प्रश्न विचारले. आलियानं लैंगिक संबंध, लग्नाआधी गर्भधारणा यासारख्या विषयांवरही प्रश्न केले होते.
2 / 7
व्हिडीओच्या सुरुवातीला, आलिया अनुरागला विचारते की जर मी लेस्बियन आहे हे त्याला कळेल तेव्हा त्याची प्रतिक्रिया काय असेल? यावर प्रतिक्रिया व्यक्त करून अनुरागनं सर्व पालकांना एक संदेशही दिला.
3 / 7
अनुराग म्हणाला- 'मी म्हणेल की तुम्हाला ज्या गोष्टीबद्दल कळत नाही त्याबद्दल घाबरू नका. ते पालक जास्त घाबरतात कारण त्यांना या गोष्टीची भीती वाटते. नेहमी मागे वळून पाहा आणि त्या वयात आपण कसे होतो आणि आपल्याला कसं वाटायचं जेव्हा आपले आई-वडिल आपल्याला समजून घेत नव्हते.
4 / 7
आलिया कश्यप 20 वर्षांची आहे. ती शेन ग्रेगोअरशी रिलेशनशिपमध्ये आहे. दोघं एका डेटिंग अॅपद्वारे भेटले. आलिया नेहमीच शेनबरोबर आपलं प्रेम व्यक्त करते. एवढंच नाही तर नवनवीन पोस्ट शेअर करते.
5 / 7
शेनबरोबरच्या तिच्या नात्याबद्दल आलिया अगदी मोकळी आहे. अनुरागही शेनला भेटला आहे. तिच्या व्हिडीओमध्ये आलियानंही हा प्रश्न विचारला आहे की अनुरागला तिचा प्रियकर शेन आवडतो का?
6 / 7
या प्रश्नाला उत्तर देताना तो म्हणाला- मला शेन आवडतो. मुलांबद्दलची तुझी निवड मला सहसा आवडते. तो खूप शांत आहे आणि त्याच्यात असे गुण आहेत जे 40 वर्षांच्या पुरुषमध्ये असणं सुद्धा कठीण आहे.
7 / 7
आलिया कश्यपविषयी बोलायचं झालं तर ती सोशल मीडियावर खूप अॅक्टिव आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 2 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. ती यूट्यूबवर आपले व्हिडीओ शेअर करत असते.