नागराज मंजुळे दिग्दर्शित 'झुंड' या चित्रपटाच्या ट्रेलरमधील 'भावना भाभी' या पात्राने विशेष लक्ष वेधून घेतलं.
चित्रपटातील ही भावना नेमकी आहे तरी कोण, याबद्दल नेटकऱ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली.
सायली पाटीलने 'झुंड'मध्ये भावना भाभीची भूमिका साकारली आहे.
सायली ही आर्किटेक्टसुद्धा आहे.
नागराज मंजुळे आणि त्यांच्या भावाने मिळून 'झुंड' या चित्रपटातील कलाकारांची निवड केली आहे.
ट्रेलरमधील 'भावना'ची भूमिका पाहून अनेकांनी सोशल मीडियावर सायलीचा प्रोफाइल शोधण्याचा प्रयत्न केला.
सायली ही इन्स्टाग्राम या फोटो शेअरिंग अॅपवर सक्रिय असून त्यावर तिने सुंदर फोटो पोस्ट केले आहेत.
'झुंड' हा चित्रपट 4 मार्च रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत आहेत.