Varsha Usgaonkar : घरात CCTV कॅमेरे, पोलीस केस, वर्षा उसगांवकर यांच्या कुटुंबातील वाद नेमका काय?
Varsha Usgaonkar : अभिनय आणि नृत्याने एककाळ मराठी चित्रपट सृष्टी गाजवणाऱ्या वर्षा उसगांवकर यांची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. कारणही तसच आहे, वर्षा उसगांवकर यांनी बिग बॉसच्या घरात प्रवेश केला आहे. वर्षा उसगांवकर यांची मोठी फॅन फॉलोइंग आहे. त्यामुळे त्यांची प्रत्येक कृती चर्चेचा विषय ठरत आहे.
will varsha usgaonkar open up about her family property dispute in bigg boss marathi season 5
Image Credit source: instagram
Follow us on
बिग बॉसचा सध्या 5 वा सीजन सुरु आहे. या सीजनमध्ये घरातील काही कलाकारांची सोशल मीडियावर, घराघरात भरपूर चर्चा आहे. यातील एक नाव म्हणजे वर्षा उसगांवकर.
मराठी चित्रपट सृष्टीत 80-90 चा काळ वर्षा उसगांवकर यांनी गाजवला. अभिनय, नृत्याच्या बळावर महाराष्ट्रात स्वत:ची एक ओळख बनवली. वर्षा उसगांवकर आता बिग बॉसमुळे चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरातील त्यांची प्रत्येक कृती चर्चेचा विषय ठरत आहे.
बिग बॉसच्या घरात अनेकदा कलाकार व्यक्तीगत आयुष्याविषयी, मनात काही खंत असेल, तर व्यक्त होतात. वर्षा उसगांवकरांच्या आयुष्यातही असच एक दु:खाच पान आहे.
सासऱ्यांच्या संपत्तीवरुन त्यांचं त्यांच्या नणंदा बरोबर भरपूर भांडण झालं होतं. बिग बॉसच्या घरात वर्षा उसगांवकर त्या विषयी कोणा बरोबर बोलणार का?
संगीत दिग्दर्शक रवी यांचा मुलगा अजय शंकर बरोबर 2000 साली वर्षा उसगांवकर यांनी लग्न केलं. पाच वर्षांपूर्वी उसगांवकर यांच्या घरात कौटुंबिक वाद असल्याची बातमी आली होती.
सांताक्रूझ मीरा बाग येथे वर्षा यांचे सासरे रवी यांचा एक मजली बंगला आहे. वर्षा यांना दोन नणंदा आहेत. छाया ओझा आणि वीण उपाध्याय दोघींनी वर्षा आणि तिचे पती अजय यांच्यावर छळाचा आणि आपल्या वडिलांचा बंगला हडपल्याचा आरोप केला होता.
रवी यांच्या निधनानंतर कौटुंबिक संपत्तीचा वाद उफाळून आला. वीणा आणि छाया यांनी पोलिसात तक्रार नोंदवली.
वांद्रे येथील सत्र न्यायालयात खटला दाखल केला. कोर्टाने बंगल्याची दोन्ही पक्षकारांमध्ये वाटणी केली.
छाया आणि वीणाला तळ मजला मिळाला. वर्षा उसगांवकर आणि अजय शंकर यांना पहिल्या मजल्यावरील एक छोटी रुम आणि मोठा बेडरुम मिळाला. ऐकमेकांच्या भागात जाऊ नका, असं कोर्टाने दोन्ही बाजूंना स्पष्टपणे सांगितलं.
अतिक्रमण टाळण्यासाठी घरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. वर्षा यांच्याकडे घरकाम करणाऱ्या महिलेने आपल्याला मारहाण केली. यासंबंधी छाया यांनी 15 ऑक्टोबर 2018 रोजी वांद्रे कोर्टात केस दाखल केली होती.