प्रियांका चोप्रा... सध्या बॉलिवूडमधल्या टॉप 5 अभिनेत्रींपैकी एक. तिच्याबद्दल प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी तिचे चाहते उत्सुक असतात. अशीच एक खास गोष्ट आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
प्रियांका चोप्राने मिस वर्डचा किताब आपल्या नावे खरा... पण तिच्या या यशामागे कुणाचा हात आहे तुम्हाला माहितीये का?
प्रियांका चोप्राने केवळ 17 व्या वर्षी 'मिस इंडिया'चा किताब जिंकला आणि याचवर्षी तिने जगाचं लक्ष वेधलं ते 'मिस वर्ल्ड'चा किताब जिंकून...
प्रियांकाला तिच्या या घवघवीत यशापर्यंत तिला घेऊन जाणारी व्यक्ती आहे. प्रियांकाचा भाऊ सिद्धार्थ चोप्रा.
सिद्धार्थने आईला सांगितलं की "प्रियांका सुंदर आहे त्यामुळे आपण तिला या स्पर्धेत उतरवूयात..." आणि त्याचमुळे जगाला 'मिस वर्ल्ड' आणि भारताला 'देसी गर्ल' मिळाली.