कॅन्सरशी लढा देणाऱ्या हिना खानची संपत्ती थक्क करणारी, कमवून ठेवलाय पाण्यासारखा पैसा
'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेत्री हिना खान हिला कॅन्सर झाल्याची माहिती समोर येत आहे. तिसऱ्या टप्प्यातील कॅन्सर झाल्याची माहिती खुद्द अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. ज्यामुळे चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. आता कॅन्सरचा सामना करणाऱ्या हिना हिची नेटवर्थ देखील तगडी आहे.
1 / 5
सध्या कॅन्सरशी झुंज लढत असल्यामुळे हिना खान हिच्याबद्दल अनेक गोष्टी समोर येत आहेत. हिना खान हिच्या नेटवर्थबद्दल चर्चा सुरु आहे. अभिनेत्रीकडे जवळपास 52 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
2 / 5
रिपोर्टनुसार, हिना दर महिन्याला तब्बल 35 लाख रुपये कमवते. 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेत एका एपिसोडसाठी हिना जवळपास दीड ते दोन लाख रुपये मानधन घ्यायची.
3 / 5
'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेमुळेच अभिनेत्री यशाच्या शिखरावर चढली. टीव्ही विश्वात सर्वात महागडी अभिनेत्री म्हणून हिना खान हिची ओळख आहे. त्यानंतर हिनाने कधीच मागे वळून पाहिलं नाही.
4 / 5
मालिकांशिवाय हिना जाहिराती आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील पैसे कमावते. सोशल मीडियावर देखील हिना कायम सक्रिय असते. पण आता अभिनेत्रीला कॅन्सर झाल्यामुळे चाहत्यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे.
5 / 5
हिना खान सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाली, 'या आजारावर मात करण्यासाठी मी मजबूत, दृढनिश्चय आणि पूर्णपणे वचनबद्ध आहे. माझे उपचार आधीच सुरू झाले आहेत.' सध्या सर्वत्र हिना खान हिची चर्चा रंगली आहे.