Yuvika Chaudhari Birthday : पती प्रिंस नरुला पेक्षा 8 वर्षे मोठी आहे युविका चौधरी, अशी झाली प्रेमाची सुरुवात
युविका चौधरी प्रिन्स नरुलापेक्षा 8 वर्षांनी मोठी आहे. तिचा जन्म 2 ऑगस्ट 1983 रोजी उत्तर प्रदेशातील बरौत येथं झाला. (Yuvika Chaudhari Birthday: Yuvika is 8 years older than her husband Prince Narula)
1 / 7
बिग बॉसच्या घरात नेहमी वाद होत असतात, मात्र काही नाती अशीही तयार होतात की ती आयुष्यभर सोबत राहतात. बिग बॉसचे असेच एक पॉवर कपल म्हणजे युविका चौधरी आणि प्रिन्स नरुला. दोघंही टीव्हीच्या जगातील प्रसिद्ध जोडपं आहेत.
2 / 7
युविका चौधरी प्रिन्स नरुलापेक्षा 8 वर्षांनी मोठी आहे. तिचा जन्म 2 ऑगस्ट 1983 रोजी उत्तर प्रदेशातील बरौत येथं झाला. ती आज सोमवारी आपला 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्ताने तिचे नातेसंबंध आणि प्रिन्स नरुला यांच्यातील उत्तम बंधनाबद्दल माहिती घेऊया.
3 / 7
बिग बॉस 9 मध्ये दोघं पहिल्यांदा एकमेकांना भेटले. या दरम्यान, प्रिन्सला युविका खूप आवडली होती. त्यांनी हृदयाच्या आकाराचा पराठा बनवून टीव्हीवर युविकाला प्रपोज केलं होतं.
4 / 7
पण युविकाला बाहेर केल्यावर आणि नोरा फतेही या शोमध्ये तिच्या जागी आल्यावर दोघांमध्ये अंतर आल्याच्या बातम्याही होत्या. नोरासोबत प्रिन्सच्या जवळीकीमुळे या प्रेमकथेमध्ये काही काळ सस्पेन्स निर्माण झाला होता.
5 / 7
मात्र बिग बॉस 9 मध्ये प्रिन्स नरुलाच्या विजयानंतर त्यांचं नातं पुन्हा सुधारू लागलं. मात्र गोष्टी पूर्वीसारख्या नव्हत्या. दोघांनीही एकमेकांना फक्त चांगले मित्र मानलं.
6 / 7
मात्र हे जोडपे बऱ्याचदा एकत्र दिसले, ज्यामुळे पुन्हा एकदा बातम्या पसरू लागल्या की नोरासोबत प्रिन्सचं प्रेम खोटं होतं आणि त्याचं खरं प्रेम युविकावर आहे.
7 / 7
युविका आणि प्रिन्सचे लग्न 12 ऑक्टोबर 2018 रोजी झाले. या लग्नाचं आयोजन मुंबईत मोठ्या थाटामाटात करण्यात आलं होतं. हे जोडपं आज त्यांच्या वैवाहिक जीवनाचा आनंद घेत आहेत.