Ratris Khel Chale 3 | ‘अशी रोखा नजर…त्यात भरलं जहर….’, पाहा ‘शेवंता’च्या अदांनी चाहते झाले घायाळ!
नुकतेच ‘शेवंता’ फेम अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar) हिने सेट वरून स्वतःचे नवे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अपूर्वा ‘शेवंता’च्या गेटअपमध्ये दिसत आहे. अपूर्वाच्या या फोटोंना चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
1 / 6
झी मराठीवरील ‘रात्रीस खेळ चाले’ (Ratris Khel Chale 3) या लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांना चांगलेच खिळवून ठेवले आहे. पहिल्या दोन भागांना चाहत्यांकडून कमालीची लोकप्रियता मिळाली होती. मात्र तिसरा सिझन सुरु झाला आणि अल्पावधीत कोरोनामुळे चित्रिकरणालाच ब्रेक लागला होता. मात्र, आता मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
2 / 6
बदललेली वेळ आणि नव्या व्यक्तिरेखांचा भरणा या काही करणांमुळे ‘रात्रीस खेळ चाले 3’ प्रेक्षकांची फारशी पकड घेऊ शकली नव्हती. मात्र, आता कलाकारांसह लेखक, निर्माते आणि दिग्दर्शकही जोरदार पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
3 / 6
'रात्रीस खेळ चाले 3' ला शेवंताचा रामराम
4 / 6
22 फेब्रुवारी 2016मध्ये चालू झालेल्या ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेन नुसता धुमाकूळ घातला होता. तळकोकणातल्या एका वाड्यातला नाईकांचा एक कुटुंब अस्सल मालवणी भाषेत प्रेक्षकांच्या समोर आले होते. अण्णा नाईकांच्या कुटुंबाची कथा सुरुवातीपासूनच गाजत होती. अण्णा, अण्णाची बायको, माधव, दत्ता, नीलिमा, सरिता, छाया आणि अभिराम ही पात्रं तर फेमस झाली, पण त्यापेक्षाही वरचढ ठरले पांडू, सुशल्या आणि शेवंता!
5 / 6
एका नाईक आडनावाच्या घराण्याची “रात्रीस खेळ चाले” ही कथा. अण्णा नाईकांच्या पापामुळे त्यांना आणि त्यांच्या पुढच्या पिढीला अत्रुप्त आत्म्यांनी दिलेले शाप भोगावे लागले. अण्णा नाईकांच्या पुढच्या पिढीची वाताहात लागली. अतृप्त आत्म्यानी नाईक वाड्याचा ताबा घेतला. एक नांदतं घर बघता बघता रसातळाला गेलं. पण या आलेल्या वादळात अण्णा नाईकांची बायको, इंदू उर्फ माई नाईक घराण्याच्या मूळ पुरुषावर आणि कुलदैवतेवर भार टाकून सगळ्या स़कटांशी शेवटपर्यंत लढते.
6 / 6
आपल्या उध्वस्त झालेल्या घराण्याला शाप मुक्त होण्यासाठी उ:शाप मिळवते. एक अशिक्षित स्त्रीसुद्धा आपला स्वाभिमान जपून, संपूर्ण घराला पुन्हा उभं करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती बाळगते आणि त्यात जिंकून दाखवते. त्याची ही एक रंजक कथा असणार आहे. नाईक घराण्याचं पाप…शाप… आणि उ:शाप यामधून झालेलं संक्रमण म्हणजेच ‘रात्रीस खेळ चाले 3’ असणार आहे.