‘मन झालं बाजींद’मध्ये ऐकू येणार ‘सनई चौघडे’, कृष्णा आणि राया अडकणार लग्नाच्या बेडीत!
‘मन झालं बाजींद’ (Mann zaal Bajind) या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकली. या मालिकेत कृष्णा आणि राया या प्रमुख व्यक्तिरेखांवर प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. आता या मालिकेत राया आणि कृष्णा यांची लग्नघटिका समीप आली आहे.
1 / 5

2 / 5
राया आणि कृष्णा एकमेकांना आपल्या आयुष्यभराच्या जोडीदाराच्या रूपात बघत नाही आहेत पण रायाच्या पत्रिकेत दोष असल्यामुळे त्याची पहिली बायको ही अल्पायुषी असेल असं भाकीत गुरुजींनी केलं आहे. त्यामुळे मालिकेत प्रेक्षकांनी पाहिलं की गुलि मावशी राया आणि कृष्णाचं लग्न लावण्यासाठी मामाला भरीस पाडतेय.
3 / 5
मामाला गुरुजींच्या भाकिताबद्दल कळलं आहे आणि ते हे भाऊसाहेबांना, अंतराच्या घरच्यांना सांगण्याचा प्रयत्न करतात. पण गुली मावशीमुळे त्याचे प्रयत्न फसतात. गुली मावशी मामाला पूर्णपणे आपल्या जाळ्यात ओढते.
4 / 5
कृष्णाला वचनात बांधून टाकते. गुली मावशीच्या षडयंत्रानुसार अंतरा लग्नाच्या मांडवातून गायब झाल्याने भाऊसाहेबांचा अपमान होताना पाहून कृष्णा रायाशी लग्न करण्यासाठी तयार होते.
5 / 5
राया आणि कृष्णा हे दोघं पण या लग्नामुळे खुश आहेत का? ते दोघं एकमेकांचा पती पत्नी म्हणून स्वीकार करतील का? हे प्रेक्षकांना एका विशेष भागात पाहायला मिळणार आहे.