‘सारेगमप लिट्ल चॅम्प्स’च्या नवीन पर्वाला सुरुवाती पासूनच प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. हा महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांचा आणि संगीत प्रेमींचा अगदी लाडका कार्यक्रम आहे. त्यातील सर्व निरागस स्पर्धकांइतकाच गोड त्यांचा परफॉर्मन्स असतो.
फक्त परीक्षक आणि प्रेक्षकच नाही तर मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकार देखील या छोट्या गायकांचे फॅन झाले आहेत. या कार्यक्रमात लोकप्रिय कलाकारांना निमंत्रित केले जाते आणि ते प्रेक्षकांनाही आवडतं. येत्या आठवड्यात या कार्यक्रमात एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व हजेरी लावणार आहे.
सुप्रसिद्ध गायिका उषा मंगेशकर या मंचावर विशेष अतिथी म्हणून विराजमान होणार आहेत. त्यांनी सर्व लिटिल चॅम्प्सच कौतुकच केलं नाही तर लता दीदींना हा एपिसोड पाहण्याची विनंती देखील केली.
उषा मंगेशकर यांच्यासोबतच माईंड रीडर केदार परुळेकर देखील या मंचावर उपस्थित असतील. उषा मंगेशकर यांच्या उपस्थितीत लिटिल चॅम्प्सने एका पेक्षा एक धमाकेदार परफॉर्मन्स सादर केले.
या आठवड्यात कोणाला गोल्डन तिकीट मिळणार? कोण हा मंच सोडून जाणार? हे प्रेक्षकांना पाहायला मिळेल