हा प्रसंग मनावर कायमचा कोरला गेला.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दिली प्रसाद ओकच्या नवीन घराला भेट

| Updated on: Jan 09, 2024 | 8:48 AM

अभिनेता प्रसाद ओकने नुकतंच नवीन घर घेतलं असून त्याची वास्तू शांती करण्यात आली. या वास्तू शांतीच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याच्या घरी खास भेट दिली. या भेटीचे काही फोटो आणि व्हिडीओ प्रसादने सोशल मीडियावर पोस्ट करत आभार मानले आहेत.

1 / 7
अभिनेता प्रसाद ओकने नुकतंच नवीन घर घेतलं आणि त्या घरात वास्तू शांती करण्यात आली. या वास्तू शांतीच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याच्या घरी खास भेट दिली. या भेटीचे फोटो शेअर करत प्रसाद ओकने भावना व्यक्त केल्या आहेत.

2 / 7
'मुख्यमंत्री साहेब.. माझ्यासारख्या एका छोट्या कलाकाराच्या विनंतीला मान देऊन तुम्ही दिलेला शब्द पाळलात आणि वास्तू शांतीच्या दिवशी आमच्या घरी आलात. अत्यंत व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून आलात,' असं प्रसादने या पोस्टमध्ये म्हटलंय.

3 / 7
'कोणताही राजकारणी अविर्भाव न ठेवता अगदी कुटुंबातलेच असल्याप्रमाणे आमच्यासोबत तुम्ही बसलात आणि जेवलात. नीट निरखून आख्खं घर पाहिलंत. हा प्रसंग आमच्या सगळ्यांच्या मनावर कायमचा कोरला गेला आहे,' अशा शब्दांत प्रसादने भावना व्यक्त केल्या आहेत.

4 / 7
प्रसादरने या पोस्टमध्ये पुढे लिहिलं, 'आपले गुरु धर्मवीर आनंद दिघे साहेब, यांच्या पावलावर पाऊल टाकत आपण ज्या पद्धतीने 'माणूस' जोडता आहात ते पाहता 'गुरुने दिला ज्ञानरुपी वसा आम्ही चालवू हा पुढे वारसा' हे शब्द तंतोतंत खरे करताय असंच वाटलं.'

5 / 7
नवीन वर्षाच्या सुरुवातीला प्रसादने त्याच्या घराबाहेरील अनोख्या नेमप्लेटचा व्हिडीओ शेअर करत नवीन घर घेतल्याची आनंदाची बातमी चाहत्यांना सांगितली होती. त्यानंतर नुकतीच त्याच्या घरात वास्तू शांती करण्यात आली.

6 / 7
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेळात वेळ काढून घरी भेट दिल्याने प्रसाद ओकने आनंद व्यक्त केला आहे. सोशल मीडियावरील पोस्टद्वारे त्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

7 / 7
प्रसादने 'धर्मवीर' या चित्रपटात एकनाथ शिंदेंचे गुरू आनंद दिघे यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.