नेता जेव्हा जेव्हा संकटात असतो, तेव्हा तेव्हा तो लोकांमध्ये जातो. त्याचीच प्रचिती आज उद्धव ठाकरेंच्या रुपानं पहायला मिळाली.
सायंकाळी उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राला संबोधीत केलं. त्यानंतर त्यांनी वर्षा हे निवासस्थानही सोडलं.
ह्या दरम्यान ठिकठिकाणी शिवसैनिक उद्धव ठाकरेंना पाठिंबा देण्यासाठी जमा झाले.
मातोश्री सोडताना त्यांचं संपूर्ण कुटुंब हे त्यांच्या सोबत होतं. मंत्री आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, तसेच तेसजस ठाकरे हे एका गाडीत दिसून आले.
मुख्यमंत्र्यांनी मातोश्री हे निवासस्थान सोडताना इथे जमलेले शिवसैनिक हे भावनिक झालेले दिसून आले.