जाणून घ्या Coconut Sugar खाल्ल्याने आरोग्याला होणारे फायदे!

| Updated on: Oct 08, 2023 | 11:14 PM

गोड खायला कुणाला आवडत नाही? डॉक्टर्स साखर खाऊ नका, कमी प्रमाणात खा असं सांगतात. ज्या लोकांना गोड खायला आवडतं ते आपले साखरेला पर्याय शोधतच असतात. साखर खाऊन तरतरी येते. आरोग्याचं नुकसानही तितकंच आहे. कोकोनट शुगर नावाचा एक प्रकार आहे जो पांढऱ्या साखरे ऐवजी पर्याय म्हणून तुम्ही वापरू शकता. जाणून घेऊया...

1 / 5
कोकोनट शुगरमध्ये लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि झिंक यांसारखे घटक असतात. हे घटक कमी प्रमाणात असले तरीसुद्धा तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो. पांढऱ्या साखरेपेक्षा कोकोनट शुगर कधीही चांगलीच. या साखरेत खूप न्यूट्रिएंट्स असतात.

2 / 5
तुम्ही कधी कोकोनट शुगर बद्दल ऐकलं आहे का? पांढऱ्या साखरेला आरोग्याचं शत्रू मानलं जातं. ही साखर कमी प्रमाणात खाण्याचे सल्ले दिले जातात. यालाच कोकोनट शुगर हा एक चांगला पर्याय आहे असं म्हणायला हरकत नाही. ही शुगर दिसायला तपकिरी असते. जाणून घेऊयात पांढऱ्या साखरेपेक्षा तपकिरी कोकोनट साखर कशी चांगली असते.

3 / 5
पांढऱ्या साखरेत ग्लाइसेमिक इंडेक्स जास्त असतो आणि कोकोनट साखरेत ग्लाइसेमिक इंडेक्स कमी असतो. ग्लाइसेमिक इंडेक्स कमी असल्या कारणाने रक्तातील साखरेची पातळी फारशी वाढत नाही. या साखरेने मधुमेहाचा धोका कमी होतो.

4 / 5
कोकोनट शुगरच्या मदतीने तुम्ही गोड पेये, गोड पदार्थ आणि अनेक गोड पक्वान्न बनवू शकता. यात तुम्हाला साखरेची कमतरता भासणार नाही. हे चवीला एकदम पांढऱ्या साखरे सारखंच असतं.

5 / 5
हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की कोकोनट शुगर ही शेवटी साखरेचाच एक प्रकार आहे. साखर खाल्ल्याने दात किडतात, वजन वाढते, मधुमेहाचा त्रास होतो, इतर रोगांचा धोका वाढतो. कोकोनट शुगरचे फायदे जरी असले तरी देखील शेवटी ती साखर आहे, जास्त प्रमाणात खाल्ल्याने नुकसान तर आहेच.