वर्धा : वाघांचे आश्रयस्थान असलेले बोर व्याघ्र प्रकल्प सध्या विविध वन्यप्राण्यांनी फुलले आहे. वाघ, मोर, रानकुत्रे, हरिण आदी विविध वन्यप्राणी दिसू लागल्याने बोर व्याघ्र प्रकल्पामध्ये पर्यटकांचा ओढाही वाढलाय. व्याघ्र प्रकल्पाची राणी अशी ओळख असलेल्या बीटीआर-3 या कॅटरिना नामक वाघिणीचे तिच्या दोन छाव्यांसोबत यंदाच्या उन्हाळ्यात बोर व्याघ्र प्रकल्पातील कोअर झोनमध्ये वास्तव्य राहिले.
Ad
वाघांचे आश्रयस्थान असलेले बोर व्याघ्र प्रकल्प सध्या विविध वन्यप्राण्यांनी फुलले आहे
सध्या कॅटरिना नामक वाघिणीसह तिच्या तेरा महिन्यांच्या दोन छाव्यांचे पर्यटकांना दर्शन होत आहे. बोर व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारीसाठी येणाऱ्यांचा आनंद द्विगुणितच होत आहे. बोर व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारी सुरू करण्यात आली आहे.
वाघिणीसह तिच्या तेरा महिन्यांच्या दोन छाव्यांचा व्हिडीओ अभयारण्यातील गाईड मनोज लाखे यांनी आपल्या कॅमेरात कैद केलाय. बोर अभयारण्यामध्ये पर्यटकांना नियमितपणे वाघाचे दर्शन होते.
बिबट्याचे इतकेच नव्हे तर विविध प्रकारच्या मनमोहक वन्यजीवांचे दर्शन होत असल्याने पर्यटकांचे आकर्षण वाढले आहे. येथे अस्वल, चिंकारा, हरीण आदींसह विविध जाती प्रजातींचे पक्षी नजरेस पडत आहे.
येथे जंगल सफारीसाठी पहाटे 5.30 ते 9.30 आणि दुपारी 3 ते सायंकाळी 7 पर्यंत जाण्याची परवानगी आहे. दररोज सुमारे 8 ते 10 गाड्यांमधून पर्यटक सफारीसाठी जात असल्याची माहिती आहे. कोरोनाचा प्रभाव कमी झालाय.
सध्या या ठिकाणी दररोज शेकडो पर्यटक जंगलसफारीसाठी येत आहेत. मोहाची बशी आणि ओबेरॉय बशी या भागात व्याघ्रदर्शन होत असल्याने या दोन्ही ठिकाणांना वाघांचे आवडीचे स्थान अशी नवीन ओळखच मिळत आहे.