CWG 2022: विराट कोहली ज्या खेळाडूचा खर्च उचलतो, ती 14 वर्षांची मुलगी देशाला मिळवून देणार गोल्ड मेडल

| Updated on: Jul 22, 2022 | 10:47 AM

बर्मिंघम मध्ये होणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्स मध्ये भारताकडून 215 खेळाडूंच पथक सहभागी होणार आहे. यात 14 वर्षांची स्क्वॅशपटू अनाहत सिंहचा सुद्धा समावेश आहे.

1 / 5
बर्मिंघम मध्ये होणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्स मध्ये भारताकडून 215 खेळाडूंच पथक सहभागी होणार आहे. यात 14 वर्षांची स्क्वॅशपटू अनाहत सिंहचा सुद्धा समावेश आहे. या पथकातील ती सर्वात युवा खेळाडू आहे. अनाहतने मागच्या काही काळात अंडर 15 कॅटेगरीमध्ये शानदार प्रदर्शन केलय. त्यामुळेच तिची कॉमनवेल्थ गेम्ससाठी निवड करण्यात आली आहे.   (Twitter)

2 / 5
अनाहत आधी बॅडमिंटन खेळायची. तिची मोठी बहिण स्क्वॅश खेळायची. 6 व्या वर्षापासून मोठ्या बहिणीला पाहून तिने स्क्वॅश खेळायला सुरुवात केली. लहानवयातच तिने आपला दबदबा निर्माण केला. वयाच्या 8 व्या वर्षी अंडर 11 कॅटेगरीत ती देशाची नंबर एक खेळाडू बनली. (instagram)

3 / 5
अनाहत आणि तिची बहिण अमिरा दोघींना माजी राष्ट्रीय खेळाडू अमजद खान आणि अशरफ हुसैन यांनी ट्रेन केलं आहे. आई-वडिलांसोबतच त्यांना शाळेकडूनही भरपूर मदत मिळाली. स्क्वॅशचा ऑलिम्पिक मध्ये समावेश व्हावा अशी तिची इच्छा आहे.

4 / 5
अनाहतने मागच्यावर्षी ज्यूनियर यूएस ओपन स्क्वॅश स्पर्धा जिंकली होती. या स्पर्धेत कुठल्याही कॅटेगरीमध्ये किताब जिंकणारी ती पहिली भारतीय होती. 2019 साली एशियन ज्यूनियर चॅम्पियनशिप मध्येही तिने कांस्य पदक मिळवलं होतं. सध्या ती अंडर 15 कॅटेगरीमध्ये देशाची आणि आशियातील नंबर एक खेळाडू आहे.

5 / 5
अनाहत सिंहच माजी भारतीय कर्णधार आणि दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहली बरोबर खास नातं आहे. अनाहतला विराट कोहली फाऊंडेशनने स्पॉन्सरशिप दिली आहे. कोहलीची फाऊंडेशन देशातील प्रतिभावान खेळाडूंना मदत करते. यात टेनिस खेळाडू सुमित नागल, करमन कौर थांडी सारखे क्रीडापटू आहेत.