Bigg Boss फेम शालीन भनोट याच्या पहिल्या पत्नीने केली नव्या आयुष्याला सुरुवात
अभिनेता शालीन भनोट याची पहिली पत्नी आणि अभिनेत्री दलजीत कौर हिने पती निखिल पटेल याच्यासोबत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. लग्नानंतर अभिनेत्री मुलाला घेवून पतीसोबत परदेशात शिफ्ट होणार आहे.
1 / 5
शालीन यांची पहिली पत्नी आणि अभिनेत्री दलजीत कौर (Dalljiet Kaur) हिने शालीनवर घरगुती हिंसाचारासारखे गंभीर आरोप केले होते. लग्नानंतर ६ वर्षांनी दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
2 / 5
दलजीत हिने घटस्फोटानंतर अनेक वर्षांनी दुसरं लग्न करण्याचा विचार केला आहे. दलजीत कौर हिने पती निखिल पटेल याच्यासोबत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्री पतीसोबत फोटो व्हायरल होत आहेत.
3 / 5
फोटोमध्ये दलजीत नवरीच्या रुपात फार सुंदर दिसत आहे. तर निखिल देखील रुबाबदार दिसत. सध्या सोशल मीडियावर दलजीत आणि निखिल यांच्या लग्नाच्या फोटोंची चर्चा आहे.
4 / 5
काही दिवसांपूर्वी दलजीत हिला शुभेच्छा देत शालीन म्हणाला, ‘मी तिच्यासाठी उत्तम आयुष्याची प्रार्थना करतो. तिच्या आयुष्यात भरपूर प्रेम राहवं यासाठी मी शुभेच्छा करतो. मी तिच्या नव्या आयुष्यासाठी आणि नव्या सुरुवातीसाठी आनंदी आहे…’ असं अभिनेता म्हणाला.
5 / 5
दलजीद हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत नव्या आयुष्याला लवकरच सुरुवात करणार असल्याची माहिती चाहत्यांना दिली होती, आता अभिनेत्रीचे लग्नाचे फोटो व्हायरल होत आहेत. दलजीत आणि निखिल यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी दोघांना नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.