दुसऱ्या लग्नातही अभिनेत्रीला अपयश; अशी झाली घटस्फोटीत बिझनेसमनशी भेट
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दलजीत कौरने तिच्या पतीवर विवाहबाह्य संबंधाचे आरोप केले आहेत. लग्नाच्या काही महिन्यांतच ती मुलाला घेऊन भारतात परतली. त्यानंतर आता ती सोशल मीडियाद्वारे निखिल पटेलविरोधात अनेक आरोप करताना दिसतेय.
1 / 6
'इस प्यार को क्या नाम दूँ' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दलजीत कौर सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. दलजीत सोशल मीडियावर विविध पोस्ट लिहित पती निखिल पटेलवर अनेक आरोप करत आहे. मार्च 2023 मध्ये तिने बिझनेसमन निखिलशी दुसरं लग्न केलं होतं.
2 / 6
लग्नाच्या अवघ्या काही महिन्यांतच दलजीत मुलाला घेऊन भारतात परतली आहे. दलजीत आणि निखिलची पहिली भेट कशी झाली, याविषयी तिने एका जुन्या मुलाखतीत सांगितलं होतं. या दोघांचंही हे दुसरं लग्न आहे.
3 / 6
दलजीत कौर आणि निखिल पटेल यांची पहिली भेट ही दुबईत एका मित्राच्या पार्टीत झाली होती. या भेटीविषयी दलजीतने एका मुलाखतीत सांगितलं होतं, "त्यावेळी मी फक्त माझ्या मुलाबद्दल बोलत होती आणि निखिल फक्त त्याच्या दोन मुलींबद्दल बोलत होता."
4 / 6
"निथिलच्या पायाच्या बोटाला निळ्या रंगाची नेल पॉलिश लावलेली मला दिसली. त्याबद्दल विचारलं असताना तो म्हणाला की, मी दोन मुलींचा पिता आहे. ती पहिली भेट म्हणजे फक्त दोन सिंगल पालकांनी सहज मारलेल्या गप्पा होत्या. त्यावेळी आमच्यात रोमान्स नव्हता", असं तिने सांगितलं.
5 / 6
"जसजसा वेळ पुढे गेला, तसतसं आमच्या मनात प्रेमाची भावना निर्माण झाली. आमच्या मुलांबद्दल असलेल्या प्रेमामुळे आम्ही एकत्र आलो", असं दलजीत म्हणाली. निखिलला अरियाना आणि अनिका या दोन मुली आहेत. त्यापैकी अनिका ही तिच्या आईसोबत अमेरिकेत राहते. तर अरियाना तिच्या वडिलांसोबत राहते.
6 / 6
दलजीतने निखिलवर विवाहबाह्य संबंधाचे आरोप केले आहेत. त्याचप्रमाणे आणखी एका पोस्टद्वारे असाही खुलासा केला की निखिल दलजीतसोबतच्या लग्नाला मान्यता देत नाहीये. त्याने हे लग्न स्वीकारण्यास अमान्य केलंय, असं तिने म्हटलंय.