‘हेयरस्टायलिस्ट घाईत होती का?’ Oscar 2023 पार्टीतील लूकमुळे दीपिका पादुकोण ट्रोल
Deepika Padukone At Oscars : यंदाच्या वर्षातील ऑस्कर पुरस्कार सोहळा भारतीसाठी अत्यंत खास होता. पुरस्कार सोहळ्यात भारतीय विजेत्यांसोबतच अभिनेत्री दीपिका पादुकोण हिच्या नावाची देखील तुफान चर्चा रंगली. यंदाद्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात दीपिकाने प्रेजेंटर म्हणून प्रवेश केला. सध्या अभिनेत्रीच्या लूकची तुफान चर्चा रंगली आहे.
1 / 5
अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर, हॉलिवूडमध्ये देखील स्वतःचं स्थान पक्क केलं आहे. हॉलिवूडच्या सिनेमांमध्ये झळकल्यानंतर दीपिका हिने यंदाच्या वर्षी ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात दीपिकाने प्रेजेंटर म्हणून प्रवेश केला.
2 / 5
यंदाचा पुरस्कार सोहळा भारतासाठी खूपच खास ठरला. कारण एक नव्हे तर दोन ऑस्कर पुरस्कार भारताने पटकावले आहेत. संपूर्ण भारतीयांसाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण होता. ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ या लघुपटाने ‘सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट’ विभागात पुरस्कार पटकावला. तर सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या विभागात RRR चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याने बाजी मारली.
3 / 5
नाटू नाटू या गाण्यावर ऑस्करच्या मंचावर दमदार डान्स परफॉर्मन्सही पार पडला. नाटू नाटू या गाण्यावर ऑस्करच्या मंचावर दमदार डान्स परफॉर्मन्सही पार पडला. नाटू नाटू या गाण्यावर ऑस्करच्या मंचावर दमदार डान्स परफॉर्मन्सही पार पडला.
4 / 5
परफॉर्मन्सची घोषणा अभिनेत्री दीपिका पदुकोणने मंचावर येऊन केली. पण जेव्हा संगीतकार एम. एम. किरवाणी आणि गीतकार चंद्रबोस हे ट्रॉफी स्वीकारण्यासाठी मंचावर गेले तेव्हा दीपिका पादुकोण भावुक झाली.
5 / 5
पुरस्कार सोहळ्या दरम्यान तिच्या लूकची देखील तुफान चर्चा रंगली. ऑस्करच्या पार्टीसाठी दीपिकाने पर्पल रंगाचा ग्लॅमरस ड्रेस घातला. यावेळी दीपिकाने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले. काही चाहत्यांना अभिनेत्रीचा लूक आवडला तर, काहींनी मात्र ट्रोल केलं. एक नेटकरी अभिनेत्रीचे केस पाहून म्हणाला 'हेयरस्टायलिस्ट घाईत होती का?', तर अन्य एक युजर म्हणाला, 'भारतासाठी अभिमानाचा क्षण...'