देशाच्या राजधानीत पाणीबाणी, थेंब-थेंब पाणीही दिल्लीकरांसाठी महाग, नेमके काय घडले?
Delhi water crisis: राजधानी दिल्लीत पाण्याच्या प्रश्न तापला आहे. दिल्लीकर आता पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी आसुसलेले आहे. कारण हिमाचल प्रदेश सरकारने दिल्लीसाठी 137 क्युसेक पाणी सोडू शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी स्पष्ट सांगितले आहे. हिमाचल सरकारने दिल्लीला पाणी देण्यासाठी पुरेसे अतिरिक्त पाणी नसल्याचे म्हटले आहे.