Marathi News Photo gallery Dev Uthani Ekadashi 2021 shree vithal mandir decoration on occasion of kartiki puja done by ajit pawar
बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल… कार्तिक एकादशी निमित्त विठुरायाला फुलांची आकर्षक आरास
आज कार्तिक एकादशी असल्याने श्री विठ्ठल रुक्मिणीमातेच्या गर्भगृहात झेंडु , शेवंती ,कार्नेशियन ,गुलाब अशा विविध पंधरा प्रकारच्या फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. या सजावटीसाठी वेगवेगळ्या पाच टन फुलांचा वापर करण्यात आला असुन ही सजावट पुणे येथील विठ्ठल भक्त राम जामभुळकर यानी केली आहे.
1 / 6
कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरातील विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट केली. गेल्या 3 दिवसांपासून ही तयारी करण्यात आली आहेया वर्षी विठ्ठल मंदिराला एकुण 5 टन फुलांची सजावट केली गेली आहे. साधारण 30 ते 35 कारागीरांनी यासाठी मेहनत घेतली आहे.
2 / 6
आज कार्तिक एकादशी असल्याने श्री विठ्ठल रुक्मिणीमातेच्या गर्भगृहात झेंडु , शेवंती ,कार्नेशियन ,गुलाब अशा विविध पंधरा प्रकारच्या फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. या सजावटीसाठी वेगवेगळ्या पाच टन फुलांचा वापर करण्यात आला असुन ही सजावट पुणे येथील विठ्ठल भक्त राम जांभूळकर यानी केली आहे.
3 / 6
कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने आज पहाटे अडीच वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली. त्यांच्यासोबत वारकरी प्रतिनिधी म्हणून श्री विठ्ठल रुक्मिणीमातेची महापूजा करण्याचा मान नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील कोंडिबा टोणगे आणि त्यांच्या पत्नी प्रयागबाइ टोणगे यांना मिळाला.
4 / 6
राम जांभूळकर हे गेल्या 5 वर्षांपासून विठ्ठलाची सेवा म्हणून सजावट करत आहेत. या वर्षी 4 ते 5 टन फुलांचा वापर केला गेला आहे. फुलांच्या या सजावटीसाठी साधारण 30 ते 40 कामगारांनी काम केले आहे ,अशी माहिती राम जांभूळकर यांनी दिली. श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेचा गाभारा झेंडूच्या फुलासह विविध आकर्षक पाना फुलानी सजवण्यात आला आहे तसेच सोळखांबी , सभामंडप अशा मंदिराच्या विविध भागाना देखील देशी विदेशी फुलांची सजावट करण्यात आली आहे.
5 / 6
या सजावटीमध्ये टोपल्यांचे सजावट करण्यात आले आहे. टोपल्यांना लावलेली फुले सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. गाभाऱ्याचे दृष्य पाहून प्रत्येक जण मंत्रमुग्ध झालेला पाहायला मिळत आहे. या शुभ प्रसंगी लडक्या विठुरायाला सफेद रंगाचे वस्त्र परिधान करण्यात आले आहे. फुलांची आरासामध्ये विठुरायाला पाहणे हा एक सुंदर क्षण आहे.
6 / 6
काार्तिक महिन्यातील देवउठनी एकादशी (Dev Uthani Ekadashi Importance) साजरी करण्यात येते. म्हणजेच कार्तिकी एकादशी साजरी होते. वर्षभरातील सर्व व्रतांमध्ये या एकादशीचे व्रत शुभ आणि महत्त्वाची मानली जाते. या एकादशी व्रताचे वर्णन महाभारताच्या कथेतही आढळते. श्रीकृष्णाने युधिष्ठिराला एकादशी व्रताचे महत्त्व सांगितले होते. यानंतर युधिष्ठिराने एकादशीचे व्रत विधिवत पूर्ण होते.