Marathi News Photo gallery Devmanus fame Kiran Gaikwad ties knot with Vaishnavi Kalyankar Lagira Zhala Jee team unique wishes
ना शितली.. ना जयडी..; किरण गायकवाडला ‘लागीरं झालं जी’च्या टीमकडून लग्नाच्या भन्नाट शुभेच्छा
'देवमाणूस' फेम किरण गायकवाड नुकताच लग्नबंधनात अडकला असून त्याच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 'लागीरं झालं जी'च्या टीमने किरणला लग्नाच्या हटके शुभेच्छा दिल्या आहेत.
1 / 6
'लागीरं झालं जी', 'देवमाणूस' यांसारख्या मालिकांमधून अभिनेता किरण गायकवाड घराघरात पोहोचला. नुकताच त्याचा लग्नसोहळा पार पडला असून सोशल मीडियावर या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
2 / 6
किरण गायकवाडने वैष्णवी कल्याणकरशी लग्न केलंय. मालवणमध्ये अत्यंत धूमधडाक्यात हा लग्नसोहळा पार पडला. किरण आणि वैष्णवीच्या लग्नाचे फोटो व्हायरल होताच त्यावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
3 / 6
'लागीरं झालं जी'च्या टीमने किरणला लग्नाच्या अत्यंत हटके शुभेच्छा दिल्या आहेत. एखाद्या बॅनरप्रमाणे त्यांनी किरण आणि वैष्णवीचा हा पोस्टर एडिट केला आहे. त्यावरील मजकुराने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलंय.
4 / 6
'आमच्या येथे झी मराठी कृपेने देवमाणसाच्या आशीर्वादाने किरण आणि वैष्णवी यांना प्रेमाचे लागीर झालं जी... ना शितली, ना जयडी.. वैष्णवी होणार भैय्यासाहेबाची बायडी', असा मजकूर यावर लिहिलेला आहे.
5 / 6
किरण आणि वैष्णवीच्या लग्नाला 'लागीरं झालं जी' मालिकेतल्या कलाकारांचीही उपस्थिती होती. निखिल चव्हाण, सुमीत पुसावणे, महेश जाधव, अमरनाथ खराडे, राहुल मगदुम, पूर्वा शिंदे हे कलाकार या लग्नाला हजर होते.
6 / 6
किरण आणि वैष्णवीवर सध्या चाहत्यांकडूनही शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. वैष्णवीसोबतच्या लग्नाआधी किरणचं दुसऱ्या मुलीशी अरेंज मॅरेज ठरलं होतं. मात्र त्यानंतर त्याला एका त्रासदायक अनुभवाला सामोरं जावं लागलं होतं. सहा महिने संपर्कात राहिल्यानंतर, दोन-तीनदा भेटल्यानंतर ती मुलगी डबल डेट करत असल्याचा खुलासा किरणसमोर आला होता.