Marathi News Photo gallery Dharamveer 2 trailer launch event salman khan hugs govinda ankita lokhande rakul preet singh boman irani attended event
‘धर्मवीर 2’ ट्रेलर लाँचमध्ये सलमानने गोविंदाला मारली मिठी; अंकिता-विकीसह हे सेलिब्रिटी पोहोचले कार्यक्रमाला
'धर्मवीर 2' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. शनिवारी पार पडलेल्या या ट्रेलर लाँच कार्यक्रमात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची उपस्थिती पहायला मिळाली. यावेळी अभिनेता सलमान खानने गोविंदाची गळाभेट घेतली.
1 / 8
गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला 'धर्मवीर 2' या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. या कार्यक्रमाला बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक कलाकार उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनेता सलमान खानचं पैठणीचा शॉल घालून स्वागत केलं.
2 / 8
'धर्मवीर 2'च्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात सलमान खानसह अभिनेते जितेंद्र आणि गोविंदा हेसुद्धा उपस्थित होते. सलमानने या दोघांची गळाभेट घेतली. कार्यक्रमातील हे खास क्षण कॅमेरात टिपले गेले.
3 / 8
ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमात गोविंदाने पांढऱ्या रंगाचा शर्ट-पँट आणि त्यावर निळ्या रंगाचा ब्लेझर परिधान केला होता. गोविंदालाही पैठणीचा शॉल भेट देऊन त्याचं स्वागत करण्यात आलं.
4 / 8
अभिनेत्री रकुल प्रीत सिंह तिच्या पतीसह 'धर्मवीर 2'च्या ट्रेलर लाँचचा उपस्थित होती. यावेळी तिने प्रिंटेड साडी नेसली होती. तर जॅकी भगनानीने कुर्ता आणि पायजमा परिधान केला होता.
5 / 8
अभिनेत्री अंकिता लोखंडे तिचा पती विकी जैनसोबत या कार्यक्रमाला पोहोचली होती. यावेळी दोघांनीही काळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. अंकिताने काळ्या रंगाडी सिल्क साडी नेसली होती तर विकीने काळ्या रंगाचा शर्ट-पँट परिधान केला होता.
6 / 8
अभिनेत्री आकांक्षा पुरीसुद्धा 'धर्मवीर 2'च्या ट्रेलर लाँच कार्यक्रमाला उपस्थित होती. या कार्यक्रमात तिने पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला होता.
7 / 8
अभिनेते बोमन इराणीसुद्धा या कार्यक्रमाला पारंपरिक अंदाजात पोहोचले होते. त्यांनी यावेळी पांढऱ्या रंगाचा कुर्ता-पायजमा आणि त्यावर करड्या रंगाचा जॅकेट परिधान केला होता. कार्यक्रमाला उपस्थित पाहुण्यांचा पैठणीचा शॉल देऊन सन्मान करण्यात आला.
8 / 8
'धर्मवीर 2'च्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात अभिनेत्री अमृता खानविलकरसुद्धा पोहोचली होती. यावेळी तिने अभिनेता प्रसाद ओक आणि त्याच्या पत्नीसोबत फोटोसाठी पोझ दिले.