“नेता स्वत:च्या घरात नाही तर..”; ‘धर्मवीर 2’च्या ट्रेलरमधील 6 दमदार डायलॉग

| Updated on: Jul 21, 2024 | 11:35 AM

गुरूपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला प्रवीण तरडे दिग्दर्शित 'धर्मवीर 2' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. त्यातील दमदार संवादांची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. या ट्रेलरमधील असे कोणते सहा दमदार डायलॉग्स आहेत, ते पाहुयात..

1 / 6
ज्या डायलॉगने या ट्रेलरची सुरुवात होते, तो आहे.. "आपल्या संघटनेचा माज आहे हा भगवा रंग.. सनातन हिंदू धर्माचा संस्कार आहे हा भगवा रंग.. छत्रपची शिवरायांचं स्वप्न होता हा भगवा रंग.. आणि कोणाशी तरी आघाडी करून तुम्ही विकलात तो भगवा रंग!"

2 / 6
या ट्रेलरमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या तोंडी असलेला संवाद , "काय आहे हिंदुत्व? सांगा ना काय आहे हिंदुत्व? अरे 18 पगड जातीजमातींनी एकमेकांना करकचून मारलेल्या मिठीत हिंदुत्व आहे."

3 / 6
"आपणच जर आपल्या धर्माची इज्जत नाही राखली तर दुसरे कोणतरी येऊन ती उतरवतील," असा संवाद ट्रेलरमध्ये आनंद दिघे यांच्या तोंडी आहे.

4 / 6
"सावरकर समझने के लिए देशभक्त बनना पडेगा, किसी एक फॅमिली का कुत्ता नहीं"

5 / 6
"नेता स्वत:च्या घरात नाही, लोकांच्या दारातच शोभून दिसतो. म्हणूनच तुम्ही लोकांच्या दारातले नेते व्हा."

6 / 6
"तुझ्या आणि हिंदुत्त्वाच्या मध्ये इथून पुढे मी जरी आलो, तरी मला बाजूला सारून हिंदुत्त्वाला मिठी मार", या दिघे साहेबांच्या तोंडी असणाऱ्या डायलॉगने अंगावर काटा उभा राहतो, अशा प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.