नुकताच दिलजीत दोसांझ याने मोठा खुलासा केलाय. यावेळी त्याने थेट सांगितले की, त्याने घरातून पळून जाण्याचे ठरवले होते आणि त्यावेळी नेमके काय घडले.
दिलजीत दोसांझ म्हणाला की, मी आठ वर्षांचा असताना शाळेतील एका मोठ्या मुलीच्या प्रेमात पडलो. मित्रांनी त्या मुलीला प्रेमाबद्दल सांगण्यासाठी फोर्स केला.
मी त्या मुलीकडे जाऊन म्हणालो की, चल आपण लग्न करूयात. त्या मुलीने थेट माझी तक्रार शिक्षकांकडेच केली आणि त्यांनी मला पालकांना शाळेत घेऊन येण्यास सांगितले.
त्यानंतर मी थेट घरातून पळून जाण्याचे ठरवले. हेच नाही तर फ्रीजमधील काही फळे बॅगमधून घेऊन मी घरातून सायकल घेत पळ काढला.
गावातून बाहेर पडत असताना काही लोकांनी मला पकडले आणि घरी पाठवले. त्यानंतर पोट दुखत असल्याचे सांगून मी तीन दिवस शाळेतच गेलो नाही.