Turmeric | हळदीच्या पोषक घटकांचा फायदा घ्या, पण अतिसेवनाने होतील ‘हे’ तोटे!
हळद हा आपल्या स्वयंपाकघराचा महत्त्वाचा भाग आहे. हा असा मसाला आहे जो केवळ अन्नाची चव वाढवण्यासाठी वापरला जात नाही तर अनेक ब्युटी प्रॉडक्ट्समध्येही याचा वापर केला जातो. हळदीमध्ये अनेक पोषक घटक असतात. तुम्ही नेहमीच हळदीचे फायदे वाचलेत, पण तुम्हाला याचे तोटे माहित आहेत का? हळदीच्या अति सेवनाने काय दुष्परिणाम होतात? वाचा...
1 / 5
कॅलरी, फॅट्स, कॅल्शियम, फॉस्फरस, सोडियम, पोटॅशियम, लोह आणि थायमिन हे महत्त्वपूर्ण घटक हळदीमध्ये असतात. हळदीशिवाय भाज्यांना चव नाही. मसाल्यांमधील हळद हा एक महत्त्वाचा घटक आहे. इतके पोषक घटक असताना देखील हळदीचे अतिसेवन आरोग्यासाठी घातक आहे.
2 / 5
हळद आरोग्यासाठी खूप चांगली असते. पण कोणतीही गोष्ट जास्त खाल्ल्याने त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. हळदीचे जास्त सेवन केल्याने पोटात जळजळ, अपचन आणि पोटात दुखण्याची समस्या होऊ शकते. ज्या लोकांना आधीपासूनच पोटाच्या आरोग्याची समस्या आहे त्या लोकांनी हळदीचे सेवन टाळावे.
3 / 5
ज्या लोकांना रक्ताच्या संबंधित समस्या आहेत त्या लोकांनी हळदीचे सेवन करताना काळजी घ्यावी. काहींना रक्ताच्या गुठळ्या होण्याच्या देखील समस्या असतात, हळदीमुळे रक्तप्रवाह वाढतो आणि याच कारणाने रक्तस्रावाचा विकार होण्याची समस्या निर्माण होते. हळदीचे प्रमाणात सेवन केल्यास त्याचा आरोग्याला फायदा आहे पण अतिसेवन केल्यास नुकसानच आहे.
4 / 5
खाज सुटणे, पुरळ येणे अशा समस्या हळदीच्या अतिसेवनाने निर्माण होऊ शकतात. हळद त्वचेसाठी उत्तम मानली जाते, तिचे अनेक फायदे आहेत. हळदीच्या जास्त सेवनाचा रक्तपेशींवर वाईट परिणाम होतो.
5 / 5
अनेकदा आपल्याला बऱ्याच गोष्टींची ॲलर्जी असते पण आपल्याला त्याची कल्पना नसते. ॲलर्जीची वेगळी टेस्ट देखील केली जाते. ॲलर्जी असल्यास हळदीचं सेवन चुकूनही करू नका. त्याचं सेवन करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.