रोज Dryfruits खाणारे सावध राहा! तुम्ही ‘या’ चुका करताय का?
आरोग्यासाठी चांगले असणारे ड्रायफ्रूट्स मर्यादित प्रमाणात खावेत तर त्याचा फायदा होतो. ड्रायफ्रूट्स कसे खावेत? कधी खावेत आणि किती खावेत? जास्त खाल्ल्यास त्याचे काय परिणाम होतात? कोणत्या वयाच्या लोकांसाठी काय सल्ले दिले जातात? जाणून घेऊया. एक सल्ला मात्र कॉमन असतो तो म्हणजे भरपूर पाणी प्या.
1 / 5
ड्रायफ्रूट्स आरोग्यासाठी चांगले आहेत ते रोज खा असं सांगितलं जातं. पण रोज ड्राय फ्रूट्स खाल्ले तर त्याचे काही नुकसान आहेत या नुकसानीचीही जाणीव तुम्हाला असायला हवी. जाणून घेऊ ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने काय नुकसान होऊ शकते.
2 / 5
रोजच्या जेवणातून आपल्याला ओमेगा 3 फॅटी ॲसिड आणि अमिनो ॲसिड मिळत नाही म्हणून ड्रायफ्रूट्स खाण्याचा सल्ला दिला जातो. पण या ओमेगा 3 फॅटी ॲसिड आणि अमिनो ॲसिडचं अति सेवन आरोग्यासाठी हानिकारक असतं. जर तुम्ही ड्रायफ्रूट्स रोज खात असाल तर ते कोरडे खाऊ नका ते रोज रात्री भिजवा आणि सकाळी खा.
3 / 5
रोज किती ड्रायफ्रूट्स खावेत? त्याचं प्रमाण काय असावं? ज्येष्ठ लोकांनी २५ ते ५० ग्रॅम ड्रायफ्रूट्स खावेत. ६-७ ग्रॅम बदाम, चार काजू, अर्धा चमचा खरबूज आणि टरबूज बिया, अर्धा वाटी मखाना आणि थोडे मनुका खाऊ शकता. हे प्रमाण इतकंच असेल तर आरोग्याला हानी पोहचत नाही.
4 / 5
ड्रायफ्रूट्स खाण्याचा सल्ला आरोग्यतज्ञांकडून दिला जातो. हा सल्ला प्रत्येक व्यक्तीनुसार असतो. गरोदर स्त्री, जाड व्यक्ती, बारीक व्यक्ती, एखाद्याला कुठला आजार असेल तर त्यानुसार हा सल्ला असतो. शारीरिक गरजा आणि शारीरिक स्थितीनुसार हा सल्ला असतो.
5 / 5
तुम्हाला माहित आहे का ड्रायफ्रूट्सने डिहायड्रेशन होऊ शकतं. ड्रायफ्रूट्समुळे रक्तातील साखर वाढू शकते. ड्रायफ्रूट्समुळे चरबी आणि कॅलरी वाढू शकते. रोज ड्रायफ्रूट्स खात असाल तर पुरेसं पाणी प्या.