Bhai Dooj 2021 | बहीण-भावाच्या नात्याचा मोठा उत्सव, जाणून घ्या भाऊबीजेबद्दल
दिवाळीच्या पाच प्रमुख सणांपैकी भाऊबीज हा पाचवा मोठा सण आहे. हा सण भाऊ-बहिणीच्या प्रेमाशी संबंधित आहे. यादिवशी, बहिणी आपल्या भावांच्या कपाळावर प्रेमाने टिळा लावताता आणि त्यांना दीर्घायुष्य, चांगल्या आरोग्याच्या शुभेच्छा देतात. तर, भाऊ आपल्या लाडक्या बहिणींना भेटवस्तू देतात.
-
-
दिवाळीच्या पाच प्रमुख सणांपैकी भाऊबीज हा पाचवा मोठा सण आहे. हा सण भाऊ-बहिणीच्या प्रेमाशी संबंधित आहे. यादिवशी, बहिणी आपल्या भावांच्या कपाळावर प्रेमाने टिळा लावताता आणि त्यांना दीर्घायुष्य, चांगल्या आरोग्याच्या शुभेच्छा देतात. तर, भाऊ आपल्या लाडक्या बहिणींना भेटवस्तू देतात.
-
-
कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी देशभरात साजरा होणारा भाऊबीजेचा हा सण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटकात तो भाऊबीज म्हणून साजरा केला जातो. तर मणिपूरमध्ये तो निंगोल चकबा म्हणून साजरा केला जातो. शेजारच्या नेपाळमध्ये याला भाईटिका असेही म्हणतात. नाव वेगळे असू शकते पण भावना एकच असते
-
-
भाऊबीजच्या दिवशी बहिणी आपल्या भावाला टिळा लावून मिठाई खाऊ घालतात. असे मानले जाते की बहिणीच्या हाताने तयार केलेली मिठाई किंवा अन्न खाल्ल्याने भावाचे सर्व त्रास दूर होतात आणि त्याला दिर्घायुष्य लाभते. भाऊबीजच्या दिवशी सुख आणि सौभाग्य मिळवण्यासाठी भावांनी बहिणीच्या घरी जाऊन जेवण केलेच पाहिजे. जर कोणाला बहीण नसेल तर त्याने गाय, नदी इत्यादींचे ध्यान करुन किंवा तिच्याजवळ बसून जेवण कल्यास शुभ फळ मिळते.
-
-
भाऊबीजला यम द्वितीया असेही म्हणतात. या दिवशी यमराजाची पूजा करण्याचा विशेष नियम आहे. या दिवशी ‘धर्मराज नमस्तुभ्यं समस्ते यमुनाग्रज. पाहि मां किंकरैः सार्धं सूर्यपुत्र नमोऽस्तु ते.’ या मंत्राने यमयमराजची आणि ‘यमस्वसर्नमस्तेऽस्तु यमुने लोकपूजिते. वरदा भव मे नित्यं सूर्यपुत्रि नमोऽस्तु ते.’ या मंत्राने यमुनाजींची साधना करावी.
-
-
भाऊबीजच्या दिवशी भावा-बहिणींनी यमुनेत स्नान करावे. असे मानले जाते की या दिवशी भाऊ-बहिणीने एकत्र यमुना नदीत स्नान केले तर यमुनाजींच्या कृपेने भावाचे सर्व प्रकारच्या संकटांपासून रक्षण होते आणि यम त्याचे काहीही बिघडवू शकत नाही. भाऊबीजच्या दिवशी, बहिणी बेरी पूजन करतात आणि त्यांच्या भावांच्या दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा देतात.