Young Age मध्येच सोडा या खाण्या-पिण्याच्या सवयी, नाहीतर होतील Kidney Disease

| Updated on: Sep 24, 2023 | 6:00 PM

आपण काय खातो-पितो यावर आपलं आरोग्य अवलंबून असतं. आपण जे काही खातो-पितो ते प्रमाणात असावं आणि चांगलं असावं. तरुण वयातच या गोष्टी जर मर्यादित प्रमाणात खाल्ल्या तर नक्कीच याचा चांगला परिणाम मिळतो. कोणते पदार्थ आहेत ते ज्यापासून लांब राहायला हवं? कोणते पदार्थ मर्यादित प्रमाणात खावेत? जाणून घेऊयात...

1 / 5
जास्त मीठ खाणं आरोग्यासाठी चांगलं नाही हे आपण नेहमी ऐकत आलोय. त्यामागे कारण काय? जास्त मिठाचे सेवन केले तर किडनीचे नुकसान होऊ शकते, कसं? मिठाच्या सेवनामुळे उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होते. यामुळे किडनी खराब होऊ शकते. जास्त मीठ खाणे सोडून द्या, तरुण वयातच!

2 / 5
प्रथिने खा, प्रथिने खा! हे सांगितलं जातं. पण जास्त प्रथिने शरीरासोबत काय करतात? जास्त प्रथिने किडनी बिघडवतात. उच्च प्रथिनेयुक्त आहार घेतल्यास त्याचा परिणाम होतो. मर्यादित प्रमाणात प्रथिने खा.

3 / 5
कॅफिनेटेड पेयांचे जास्त सेवन केल्याने मूत्रपिंडावर परिणाम होऊ शकतो. आपल्यापैकी बऱ्याच जणांना चहा कॉफी घेतल्याशिवाय जमत नाही, दिवस ढकलता येत नाही. पण चहा, कॉफीचं प्रमाण मर्यादित असावं. कॅफिनमुळे तरुण वयात थकवा जाणवू शकतो त्यामुळे या गोष्टी वेळीच टाळा.

4 / 5
तळलेले पदार्थ खाल तर साहजिकच किडनी खराब होईल. हे खाण्याचं एक प्रमाण असावं. मर्यादित प्रमाणात खाल्लं तर फार काही होणार नाही. पण कॉलेज कट्ट्यावर, पार्टीज मध्ये तरुणांना तळलेले पदार्थ खायची सवय असते. येता-जाता असे पदार्थ खाल्ले जातात. हे वेळीच थांबवा याने वजन वाढेल आणि किडनी खराब होईल.

5 / 5
दारू पिऊ नका असं जेव्हा सांगितलं जातं तेव्हा त्यामागे नक्कीच काही कारणं असतात. ज्या लोकांना दारूचं व्यसन असतं त्यांना किडनीचा प्रॉब्लेम होतो. ज्या गोष्टींचं व्यसन लागू शकतं, ज्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो अशा गोष्टींपासून लांब राहा.