Fridge मध्ये ही 5 फळे चुकूनही ठेऊ नका, Nutrients होतात नाहीसे!
फ्रिजमध्ये काय ठेवायचं आणि काय नाही याबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम असतो. काही फळे फ्रिजमध्ये ठेवायची नसतात तरीही आपण सर्रास ही फळे फ्रिजमध्ये ठेवतो. ही फळे जर फ्रिजमध्ये ठेवली तर Nutrients कमी होतात, नाहीसे होतात. अशी 5 फळे आहेत जी नक्कीच तुम्ही फ्रिजमध्ये ठेवत असाल पण तसं करू नका. वाचा कोणती फळे आहेत.
1 / 5
टरबूजाप्रमाणे आंबे सुद्धा लोकांना थंडच खायला आवडतात. पण तुम्ही अनेकांना हे म्हणताना ऐकलं असेल की आंबे फ्रिजमध्ये ठेऊ शकत नाही. फ्रिजमध्ये ठेवल्याने आंब्यातील पोषक घटक आणि अँटीऑक्सिडंट्स कमी होतात.
2 / 5
लिची फ्रिजमध्ये ठेवली तर ती आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. ज्या दिवशी तुम्ही लिची बाजारातून आणाल त्याच दिवशी खायला हवी. फ्रिजमध्ये ठेऊन लिची खराब होते आणि त्यातील पोषक द्रव्ये नाहीशी होतात. तुम्ही लिची बाहेर ठेऊ शकता.
3 / 5
टरबूज तर अनेकांना थंडगारच खायला आवडते. टरबूज कापून फ्रिजमध्ये ठेवलं आणि ते गार झाल्यावर खाल्लं की आपल्याला चांगलं तर वाटतं पण टरबुजाची पोषक द्रव्ये नष्ट होतात. फ्रिजमध्ये ठेवताना टरबूज जसंच्या तसं ठेवता येत नाही मग लोक ते कापून ठेवतात पण असं केल्याने एक मोठं नुकसान आहे. कारण ते कापून ठेवलं की या फळातील अँटिऑक्सिडंट्स आणि पोषक द्रव्ये नष्ट होऊ शकतात.
4 / 5
सफरचंद हे पौष्टिक फळ आहे. प्रत्येकजण सफरचंद खाण्याचा सल्ला देतो. रोज एक सफरचंद खाल्ल्याने डॉक्टरकडे जायची आवश्यकता नाही असं म्हटलं जातं. सफरचंद फ्रिजमध्ये ठेवले तर त्यातले पोषक द्रव्य नष्ट होतात. जर तुम्हाला सफरचंद फ्रिजमध्ये ठेवायचंच असेल तर तुम्ही ते कागदात गुंडाळून ठेऊ शकता.
5 / 5
केळी चुकूनही फ्रिजमध्ये ठेऊ नये. बाहेरच्या वातावरणात ठेवल्यावर केळी व्यवस्थित राहते. या फळातून इथलीन वायू बाहेर पडतो याच कारणामुळे केळी लवकर पिकते. केळी जर फ्रिजमध्ये ठेवली तर ती काळी पडते, लवकर खराब होते. खोलीच्या तापमानात केळी ठेवली तरी केळी टिकून राहते.