भारत हा क्रिकेट वेडा देश आहे. इथे क्रिकेटपटूंना देवाचा दर्जा दिला जातो. इतकंच काय तर बीसीसीआयदेखील क्रिकेटपटूंवर पैशांचा वर्षाव करते. करारा व्यतिरिक्त चांगल्या कामगिरीचं देखील मानधन दिलं जातं. (Photo - BCCI)
भारतीय क्रिकेटपटूंची सर्वाधिक कमाई बीसीसीआयच्या करारातून होते. यात चार कॅटेगरी आहेत.ए+ कॅटेगरीसाठी 7 कोटी, ए कॅटगरीसाठी 5 कोटी, बी कॅटेगरीसाठी 3 कोटी आणि सी कॅटेगरीसाठी 1 कोटी मिळतात. ए+ कॅटेगरीमध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जडेजा यांचा समावेश आहे. 2022-23 या वर्षासाठी 26 खेळाडूंसोबत करार झाला आहे. (Photo - BCCI)
करारा व्यतिरिक्त खेळाडूंना सामना फी देखील दिली जाते. जे खेळाडू करारात नाहीत त्यांना भारतासाठी सामना खेळल्यास करार असलेल्या खेळाडूंप्रमाण फी दिली जाते. कसोटीसाठी 15 लाख, वनडेसाठी 6 लाख आणि टी 20 साठी 3 लाख रुपये मिळतात. (Photo - BCCI)
बीसीसीआय खेळाडूंना बोनसदेखील देते. वनडे आणि कसोटीत दुहेरी शतक ठोकणाऱ्या खेळाडूंना 7 लाख रुपये मिळतात. वनडे आणि कसोटीत शतक ठोकणाऱ्या खेळाडूंना 5 लाख रुपये, कसोटीत 10 गडी बाद करणाऱ्या खेळाडूंना 7 लाख मिळतात. तसेच वनडे आणि कसोटीत पाच खेळाडू बाद करण्याऱ्यांना 5 लाख बोनस दिला जातो. (Photo - BCCI)
खेळाडूने सामन्यात चांगली कामगिरी केल्यानंतर बीसीसीआय बोनस देते. संघाने मोठा विजय मिळवल्यास सर्व खेळाडूंना मानधन मिळतं. आयसीसी रॅकिंगमधील टॉप तीन संघांविरुद्द एक कसोटी मॅच जिंकल्यावर सामना मानधनात 50 टक्के वाढ मिळते. मालिका जिंकल्यावर 100 टक्के फी वाढ मिळते. वनडे किंवा टी 20 वर्ल्डकप जिंकल्यावर 300 टक्के मानधन वाढवून मिळतं. (Photo - BCCI)