फेसबुक (मेटा) चे संस्थापक मार्क झुकेरबर्गच्या जगातील श्रीमंत लोकांपैकी एक आहे. त्यांच्या कामाचे कौतुकही आपण अनेकदा ऐकले असले. मात्र या झुकेरबर्ग पेहरावाबद्दल अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतात, की एवढा श्रीमंत माणूस कायम 'ग्रे रंगाचे टीशर्टच का घालतो. या पेहरावामागेचे कारण काय?
'ग्रे रंगाच्या टीशर्टच्या पेहरावाबद्दल अनेकदा स्वतः मार्क झुकेरबर्ग यांनी सार्वजनिक व्यासपीठावर खुलेपणाने माहिती दिली आहे. 2014 मध्ये सर्वात प्रथम त्यांना 'ग्रे रंगाच्या टीशर्टच्या पेहरावाबद्दल एका व्यक्तीने प्रश्न विचारला होता. त्यावेळी त्यांनी त्या व्यक्तीला पेहरावबद्दल उत्तर दिले होते.
मार्क झुकेरबर्ग म्हणाले मी माझ्या आयुष्यात सरळ आणि स्पष्टपणे जगणे पंसत करतो. ज्यामध्ये मला माझ्या कामा शिवाय इतर कोणत्याही गोष्टींबाब निर्णय घेण्यात वेळ घालवणे आवडत नाही. अगदी कपड्यांच्या निवडीसाठीही नाही. त्यामुळे सर्वाधिक वेळा माझा पेहराव एकाच किंवा एकसारख्या रंगाचा असतो.
झुकेरबर्गच्या म्हणण्यानुसार कोणता पेहराव करायचा व काय जेवण करायचे याचा निर्णय घेण्यात अधिक वेळा जाऊ शकतो. त्यामुळे वेळेची बचत करण्यासाठी मी गोष्टींकडे लक्ष देत नाही.
स्वतः झुकेरबर्गने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर आपल्या कपड्याच्या वार्डरोबचा फोटो पोस्ट केला होता. ज्यामध्ये एकासारख्या रंगाच्या कपड्यांबाबतच्या गुपितावर पडदा टाकला होता. झुकेरबर्गने शेअर केलेल्या फोटोत सर्व कपडे एकाच रंगाचे दिसतात.