स्मार्टफोन प्रत्येक व्यक्तीसाठी महत्वाचे गॅझेट आहे. आपल्या आवडीच्या गोष्टी किंवा गेम्स खेळण्यासाठी स्मार्टफोनचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. मात्र महत्त्वाच्या क्षणी बॅटरी कमी पडल्याने धावाधाव सुरु होते. पण मोबाईल स्लो चार्ज होत असल्याने अस्वस्थता वाढते. मोबाईल जलदगतीने चार्ज करण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत, त्याबाबत जाणून घ्या.
मोबाईल वेगाने चार्ज करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे स्विच ऑफ करून चार्ज करावा. यामुळे मोबाईल बॅकगाउंडला अॅप्लिकेश किंवा सर्व्हिस सुरु नसते. त्यामुळे मोबाईल वेगाने चार्ज होण्यास मदत होते.
स्मार्टफोन नेहमीपेक्षा वेगाने चार्ज करण्याची गरज असल्यास फोनवर फ्लाइट किंवा एअरप्लेन मोड चालू करा. यामुळे फोन वेगाने चार्ज होऊ लागतो.
मोबाईल चार्ज करताना जीपीएस, वायफाय, इंटरनेट आणि ब्लूटूथ बंद करा. यामुळे मोबाईल वेगाने चार्ज होण्यास मदत होते.
मोबाईल चार्ज करण्यासाठी ओरिजनल चार्जरचा वापर करा. कारण डुप्लिकेट चार्जरमुले मोबाईलची बॅटरी लाईफ कमी होते. तसेच मोबाईल चार्ज होण्यास वेळ लागतो.
मोबाईल चार्ज करत असताना त्यावर काम करू नका. अन्यथा मोबाईल चार्जिंग वेगाने होत नाही. तसेच चार्जिंग होण्यासाठी वेळ लागतो. तसेच मोबाईल पूर्ण चार्ज झाल्याशिवाय वापरू नका.